Navneet Rana Reaction On SC Verdict : अमरावती : गेल्या 12 वर्षांपासून जो संघर्ष मी केला आणि विरोधकांनी मला खूप चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला आणि अगदी खालच्या पातळीपर्यंत ते गेले, पण अखेर विजय सत्याचाच झाला, असं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) म्हणाल्या आहेत. तसेच, एका महिलेला डावलण्याचा घाट विरोधकांनी घातला होता, असंही नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
अमरावतीतून लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या नवनीत कौर राणा म्हणाल्या की, "गेल्या 12 वर्षांपासून जो संघर्ष मी केला आणि विरोधकांनी मला खूप चुकीचं बोलण्याचा प्रयत्न केला आणि अगदी खालच्या पातळीपर्यंत ते गेले. माजी सैनिकाच्या मुलीला आणि महत्त्वाचं म्हणजे, एका महिलेला खूप मजबूर केलं. हा त्रास मी गेली 12 वर्षांपासून सहन करतेय. आपण एका महिलेप्रमाणे मेहनत करु शकत नाही, प्रामाणिकपणे समाजासाठी झटू शकत नाही, त्यामुळे मला थांबवण्याचा प्रयत्न झाला. एका महिलेच्या चारित्र्यावर बोललं गेलं. फसवून कोर्टात खेचण्यात आलं. बदनामी करण्याचा घाट गेली 12 वर्षांपासून घातला गेला होता."
आज खरं सर्वांसमोर आलंय, मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो : नवनीत राणा
नवनीत कौर राणा म्हणाल्या की, "महिलांच्या जीवनात संघर्ष हा जन्मापासूनच असतो आणि तो आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहतो. पण आज खरं सर्वांसमोर आलं. मी सर्वोच्च न्यायालयाचं आभार मानते. मी खूप संघर्ष केला, खूप कठिण दिवस पाहिले आहेत. शेवटी खरं समोर आलंच. मी खूप संघर्ष केलाय. पण मी स्वतः खचले नाही आम्ही मैदानात ठामपणे उभे राहिलो. सर्व प्रसंगांवर मात करुन मी आज पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतेय."
"मी संविधान पाळणारं, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारं लेकरू आहे. मी गेली 12 वर्ष खूप काही सहन केलं. महिलांना थांबवायचं कसं, तर या पद्धतीनं बदनामी करुन, मला खाली पाडण्यासाठी प्रयत्न केले. पण म्हणतात, देव ज्यांच्या पाठीशी आहे, त्यांना काळजी करण्याची गरज नसते. देवानंच हे उत्तर त्यांना दिलेलं आहे. मी मनापासून धन्यवाद मानते.", असं नवनीत राणा म्हणाल्या.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बोलणाऱ्यांचं तोंड बंद झालं : देवेंद्र फडणवीस
नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबद्दल बोलत होते त्यांचं तोंड सुप्रीम कोर्टाच्या निकालाने बंद झालं, असं फडणवीस म्हणाले.
पाहा व्हिडीओ : Navneet Rana Amravati Lok Sabha :आम्ही लढलो, लोकांना विश्वास दिला नवनीत राणा अर्ज भरुन आल्यावर भावूक