पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचं (PM Narendra Modi) या लोकसभेला ही आम्ही मतदान (Lok Sabha Election 2024) करु, पण त्यांनी फक्त गुजरातला झुकतं माप देऊ नये. गेली पाच वर्षे महाराष्ट्रावर जो अन्याय केला, तो येणाऱ्या काळात करू नये. पुढं ही असंच घडत राहिलं तर आमच्यावर गुजरातला स्थलांतर होण्याची वेळ येईल. उमेदवारांना विजयी करण्यात निर्णायक ठरणाऱ्या महिला मतदारांनी हे ठाम मत व्यक्त केलं. 


पक्ष फुटीचं राजकारण ही या महिलांना काही पचनी पडलेलं नाही. पुतण्याशी वाद झाले तर तो तुम्ही ही शरद पवार निघाले, असं स्वतःच्या काकांना म्हणतोय. राजकारण्यांमुळं हा नको तो पायंडा पडतोय. या नेत्यांनी समाजाला चांगली दिशा दाखवावी, अशी माफक अपेक्षा महिला मतदारांनी व्यक्त केली. महागाई, बेरोजगारी आणि देशासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर ही महिलांनी परखड मतं मांडली. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशात मोठी सुधारणा झाली आहे. 10 वर्ष मोदींनी काम केलं या 10 वर्षात मोदींनी ही सुधारणा केली आहे आणि येत्या काळात ही गती वाढेल. मात्र महागाई वाढत आहे. त्यामुळे कौंटुंबिक बजेट ढासळलं आहे. घरातील धान्यापासून पेट्रोलपर्यंत सगळ्यांच्याच किंमती वाढल्या आहेत.


मोदींनी तरुणांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे!


शिक्षणासंदर्भात अनेक संधी आहेत. मात्र जे उच्चशिक्षित तरुण आहेत त्यांच्या बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या तरुणांना नोकरीच्या संधी मिळायला हव्यात. आपल्या राज्यातल्या अनेक कंपन्या बाहेर राज्यात जात आहेत. त्या कंपन्या सोडल्या तर इतर कंपन्या आणू, असं सांगितलं जातं मात्र त्याला साधारण 3 ते 4 वर्ष लागतात तोपर्यंत तरुणांचा वेळ वाया जातो. त्यामुळे मोदींनी तरुणांच्या या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे, असं ठाम मत महिलांनी व्यक्त केलं आहे. 


पदासाठी राजकारण?


सध्या राजकारणात वेगळीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळं राजकारण खुर्चीभोवती फिरत आहे. एकासोबत युती दुसऱ्यावर नाराजी, अशी परिस्थिती दिसत आहे. प्रत्येकजण पदासाठी काम करत आहे. कामासाठी पद सांभाळत नाही आहे. पदासाठीच युती केल्या आहेत. पद आधीच मिळालं असतं तर युती केलीच नसती, असंही मत महिलांनी व्यक्त केलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Lok Sabha Election 2024 : खासदाराने आमच्या  शेतकरी बापाला  कधी विचारलं का? पहिलंच मत त्यांना कसं देणार?; नव्या मतदारांचे लोकप्रतिनिधींंवर ताशेरे