Navi Mumbai : ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी माई सातारकर यांचं निधन; वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Rukmini Satarkar Passed Away : बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं आहे.
Rukmini Satarkar Passed Away : ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं आहे. नवी मुंबई (नेरूळ) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 85 वर्षांच्या होत्या. अध्यात्माच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बाबा महाराजांबरोबर त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरूळमधील स्मशानभूमीत सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सातारकर परिवाराचे निकटवर्ती माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीदेखील ट्वीट करून रूक्मिणी सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की,
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचे निधन झाले. ही मोठी दुःखद बातमी आहे. त्यांच्या निधनामुळे सातारकर कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली.
— Supriya Sule (@supriya_sule) February 2, 2023
महत्त्वाच्या बातम्या :
Sri Sri Ravi Shankar: राजकारणात धर्म नको, पण राजकारणी धार्मिक असायला हवा: श्री श्री रविशंकर