Sant Tyagi Maharaj : नांदेडच्या त्यागीनंद महाराजांच्या कारचा मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये महंत त्यागीनंद महाराजांसह दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मध्य प्रदेशातील कटनी इथे हा अपघात झाला आहे. त्यागीनंद महाराज हे उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनाला जात होते. यावेळी ही अपघातची भीषण घटना घडली आहे.


नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव  येथील परमानंद कुटिया मंदिराचे महंत योगी त्यागीनंद महाराज आणि  गावातील भाविक उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्ये दर्शनासाठी जात होते. त्यांच्या कारला मध्यप्रदेशमधील कटनी या ठिकाणी भीषण अपघात झाला. यामध्ये त्यागीनंद यांच्यासह दोन जणांचा जगीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेची माहिती पुणेगाव येथील ग्रामस्थांना कळताच त्यांनी उत्तर प्रदेश येथील घटनास्थळाकडे धाव घेतली आहे. 


उत्तर प्रदेशमध्ये देवदर्शनासाठी जाणारांमध्ये महंत त्यागीनंद महाराज (वय 52) , बळीराम विक्रम पूयड वय (48)  दत्ता नागोराव पूयड, बालाजी जाधव, माळकवठेकर, रामचंद्र पांचाळ, माधव पांचाळ, रतन कुमार आणि कारचालक संभाजी बालाजी जाधव यांचा समावेश होता. बांबू  घेऊन जाणाऱ्या ट्रकला (एनएल - 02 एन- 9314) ला टाटा सफारी कार (एम एच -26 ए के-71 33) या कारने पाठीमागून धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. त्यामध्ये  महंत त्यागीनंद महाराजांसह दोघांचा जागीच मृत्यू झाला. सदर  घटनेमुळे पुणेगाव गावावर मात्र शोककळा पसरली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर आज रात्री उशिरापर्यंत पुणेगाव येथे दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


पुणेगाव येथील मठाचे योगी त्यागी महाराज यांचे जिल्ह्यासह राज्यभरात भक्त आहेत. दरवर्षी ते पुणेगाव येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. त्यानिमित्त उत्तराखंड येथील गुरूंच्या भेटीसाठी ते दोन दिवसांपूर्वी पुणेगाव येथून कारने निघाले होते. चालकासह या कारमध्ये सात जण होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास  चालकाचा डोळा लागल्याने कारची ट्रकला पाठीमागून धडक बसली. अपघात एवढा भीषण होता की कारमधील योगी त्यागी महाराज आणि बळीराम विक्रम पुयड यांचा जागीच मृत्यू झाला.


महत्त्वाच्या बातम्या: