Maghi Ekadashi 2022 :  आज माघ शुद्ध अर्थात जया एकादशी. कोरोनाच्या महामारीनंतर जवळपास सहा महत्वाच्या वाऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आजची माघी वारी कोरोना नंतरची पहिली वारी आहे ज्या वारीला वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. यामुळं वारकऱ्यांमध्ये देखील चैतन्याचं वातावरण आहे. दरम्यान माघीच्या निमित्तानं विठुरायाची महापूजा मंदिर समितीचे सदस्य अतुल महाराज भगरे यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची महापूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते पार पडली. एसटीचा संप असूनही जवळपास चार लाख भाविक या सोहळ्यासाठी पंढरीत दाखल झाल्याने पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून निघाली आहे. विठुरायाच्या प्रमुख यात्रांपैकी माघी यात्रा ओळखली जाते. आज या सोहळ्यानिमित्त विठुरायाची महापूजा भगरे गुरुजी यांनी सपत्नीक केली. रुक्मिणी मातेची महापूजा प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सपत्नीक केली. 


आज जया एकादशीच्या मुहूर्तावर अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मंदिर समितीच्या नवीन वर्षाची डायरी आणि दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी मंदिर समिती सदस्य ज्ञानेश्वर जळगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, मुख्याधिकारी अरविंद माळी, तहसीलदार बेल्हेकर आणि मंदिर समिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते. 


विठ्ठल मंदिराची आकर्षक सजावट


आज जया एकादशीचे औचित्य साधून पुणे येथील भक्त सचिन चव्हाण, संदीप पोकळे आणि युवराज सोनार यांनी एक हजार किलो फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. आजच्या सजावटीमध्ये झेंडू, अष्टर, शेवंती, कामिनी, ओर्केट, जरबेरा अशा विविध प्रकारच्या फुलांचा वापर करून सुंदर आणि मनमोहक सजावट करण्यात आली. विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी या ठिकाणी या ठिकाणी ही फुलांची सुंदर सजावट करण्यात आली आहे.



माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल


माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल मंदिर , प्रदक्षिणा मार्ग , चंद्रभागा वाळवंट आणि दर्शन रांगेत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


इतर संबंधित बातम्या


Maghi Ekadashi Photo : आज माघी एकादशी; पाहा विठुरायाचे सावळे सुंदर रुप मनोहर


Maghi Ekadashi : वारकऱ्यांनो ही बातमी वाचा! चंद्रभागेचे पाणी पिण्यास अयोग्य, तीर्थ म्हणून प्राशन करु नका



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha