Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरसंदर्भात (Jumbo Covid Center) आरोप केले होते. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणातील त्या चहावाल्या सोमय्यांनी शोधलं आहे. त्या चहावाल्याच्या शोधात किरीट सोमय्या मुंबईच्या केईएम रुग्णालयासमोरील एका हॉटेलमध्ये पोहचले. यावेळी सोमय्यांनी हॉटेलची पाहणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, 'पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे 100 कोटींचे कंत्राट मुंबईतील सह्याद्री हॉटेल मालकाला देण्यात आले. राजीव साळुंखे यांच्या नावे हॉटेल आहे. ठाकरे सरकारने जम्बो कोविड सेंटरप्रकरणी घोटाळा केला आहे.'


यावेळी, सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका चहावाल्याला जम्बो कोविड सेंटरचे 100 कोंटींचे कंत्राट दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. पुण्यातील कंत्राट मुंबईतील एका चहावाल्याला दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज मुंबईत परळमधल्या हॉटेलमध्ये सरप्राईज व्हिजिट दिली. परळमधील या चहावालाच्या सह्याद्री हॉटेलमध्ये पोहोचले. आणि हॉटेलमालकाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सोमय्या यांनी भेट दिली त्यावेळी हॉटेलचा मालक तिथे हजर नव्हता. यानंतर सोमय्या माध्यमांशी संवाद साधून काही वेळानंतर तिथून निघाले.


जंबो कोविड सेंटरचे जबाबदारी महापालिका आणि पीएमआरडीए या दोघांची - अजित पवार


दरम्यान, यासंदर्भात काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की, 'पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक असे दोन जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले होते. या सेंटरच्या व्यवस्थापनात कोणतीही राजकीय व्यक्ती नव्हती तर, सगळी जबाबदारी पालिका आणि पीएमआरडीए अधिकाऱ्यांवर होती. मात्र या जंबो कोविड सेंटरबाबत आरोप होत असल्याने पीएमआरडीएच्या आयुक्तांना याबाबत माहिती काढायला सांगितली आहे.'


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha