Maharashtra Rain : राज्यात पावसाची सरासरी (Average rainfall) घटली आहे. सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला आहे. पावसात एका टक्क्याची तूट पडली आहे. राज्यातील 21 जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. तर 10 जिल्ह्यात पावसाची तूट असून, पाच जिल्ह्यात सरासरीहून अधिक पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, राज्यात अल निनोचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. सहा ऑगस्टपासून राज्यात मान्सूनने ब्रेक घेतला आहे.
औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, सातारा, सांगली आणि परभणीसारख्या जिल्ह्यात पावसाची मोठी तूट पाहायला मिळत आहे. राज्यात कोकणात सरासरीच्या 118 टक्के पाऊस झाला आहे. तर मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या 88 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात सरासरीच्या 92 टक्के पाऊस तर विदर्भात सरासरीच्या 94 टक्केच पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची मोठी तूट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस ?
जालना - 52 टक्के - 182.07 मिमी पाऊस
(11 ऑगस्टपर्यंत जालन्यात 349.06 मिमी सरासरी पाऊस होत असतो)
सांगली - 62 टक्के - 181.o6 मिमी पाऊस
(11 ऑगस्टपर्यंत जालन्यात 294.03 मिमी सरासरी पाऊस होत असतो)
हिंगोलीत - 69 टक्के - 333.08 मिमी पाऊस
(11 ऑगस्टपर्यंत हिंगोलीत 483मिमी सरासरी पाऊस होत असतो)
सातारा - 69 टक्के - 397 मिमी पाऊस
(11 ऑगस्टपर्यंत साताऱ्यात 576.01 मिमी सरासरी पाऊस होत असतो)
औरंगाबाद - 73 टक्के - 235.5 मिमी
(11 ऑगस्टपर्यंत औरंगाबादेत 322.4 मिमी सरासरी पाऊस होत असतो)
अमरावतीत - 73 टक्के - 390.04 मिमी
(11 ऑगस्टपर्यंत अमरावतीत 531.04 मिमी सरासरी पाऊस होत असतो)
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठ दिवस राज्यात मान्सून कमकुवत आहे. 18 ऑगस्टपर्यंत राज्यात मोठ्या पावसाची शक्यता नसल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
1 जून ते 11 ऑगस्टपर्यंत पावसाची आकडेवारी
मागील काही दिवसात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. तर काही भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. अनेक ठिकाणी शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. मुंबईसह कोकणात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पाहायली मिळत आहे. तर पश्चिम आणि मध्य महाराष्ट्राचे डोळे पावसाकडे लागले आहेत. दरम्यान, आणखी सात दिवस पावसाची वाट पाहावी लागणार आहे. पुढील सात दिवसांत मध्य महाराष्ट्रसह पश्चिम आणि दक्षिण भारतात या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: