Aurangabad Mobile Blast : औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्लाससाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा अचानक स्फोट (Mobile Blast) झाल्याने खळबळ उडाली आहे. मोबाईल चार्जिंग झाल्यावर हा 17 वर्षीय विद्यार्थी खासगी शिकवणीसाठी निघाला होता. दरम्यान अचानकच विद्यार्थ्यांच्या खिशातील मोबाईलचा आवाज होऊन स्फोट झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण या घटनेत विद्यार्थ्याचा पाय भाजला असून त्याच्यावर उपचार करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement




अधिक माहिती अशी की, गंगापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणारा 17 वर्षीय विध्यार्थी कुटुंबियांसोबत राहतो. अकरावीत तो शिक्षण घेत असून, गंगापूर येथील एका महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. सोबतच तो खासगी शिकवणीसाठी गंगापूर शहरांमध्ये शिक्षण घेतो. दरम्यान, शुक्रवार (11 ऑगस्ट) रोजी नेहमीच्या वेळेनुसार तो सकाळी उठला. उठल्यावर त्याने आपला मोबाईल चार्जिंगला लावला आणि तोपर्यंत क्लाससाठी जाण्याची तयारी करू लागला. त्यानंतर तो चार्जिंग झालेला मोबाईल घेऊन तो खासगी शिकवणीसाठी घराबाहेर पडला. विशेष म्हणजे शिकवणी साडेआठ वाजता असल्याने तो आठ वाजताच घरातून बाहेर पडला. 


दरम्यान, क्लासच्या जवळ जाताच अचानक तरुणाच्या खिशातील मोबाईल गरम होऊन त्याच्यामध्ये स्फोट झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे तो प्रचंड घाबरून गेला. यावेळी त्यांनी तात्काळ खिशातील मोबाईल खाली फेकून दिला. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोबाईलवर पाणी टाकत तरुणाला धीर दिला. या स्फोटामध्ये आदेशच्या मांडीला इजा झाली. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तरुणाला घरी नेऊन सोडत, घडलेल्या घटनेची माहिती त्याच्या घरच्यांना दिली. तर, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. 


मोबाईलचा स्फोट होऊन सात वर्षाच्या मुलाचे तोंड भाजले.


दरम्यान, असाच काही प्रकार गेल्या महिन्यात बीड जिल्ह्यात समोर आला होता. बंद पडलेल्या मोबाईलसोबत खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट (Mobile Blast) होऊन सात वर्षाच्या मुलाचे तोंड भाजले होते. ही घटना 30 जुलै रोजी सायंकाळी धारूर येथे घडली होती. त्यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली असून, आता लेकरांना मोबाईल देतांना विचार करण्याची गरज आहे. अनिकेत सोळंके असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव होते. तर, त्याच्या तोंडाला गंभीर ईजा झाल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Beed News : लेकरांना मोबाईल पासून ठेवा दूर; बीड जिल्ह्यात घडलं भयंकर प्रकार