एक्स्प्लोर
कर न भरताच पासिंग, औरंगाबाद आरटीओत घोटाळ्याचा आरोप
औरंगाबाद : औरंगाबादच्या आरटीओ कार्यालायात संगणकीय पद्धती असतानाही मॅन्युअली पासिंग करुन आरटीओ कार्यालायाची लाखोंची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. अशा पद्धतीनं पासिंग झालेल्या गाड्या, काही राजकीय व्यक्तींच्या असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे त्यातील काहींना कर चुकवल्याप्रकरणी आरटीओ कार्यालायातून नोटीस आल्यानं अनेकांचे धाबे दणाणले आहेत. हा सगळा घोटाळा आरटीओ कार्यालायातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने झाल्याचा आरोप आहे.
औरंगाबादच्या आरटीओ कार्यालायात कर भरल्याची पावती घेऊन मकसूद खान फिरत आहेत. त्यांना आरटीओ कार्यालयातून कर न भरता गाडी पासिंग करुन फसवणूक केल्याप्रकरणी नोटीस आली. गाडीची पासिंग करताना जे कर भरावे लागतात, ते भरल्याचा आणि त्यांची पावती असल्याचा दावा खान यांनी केला आहे. मात्र आरटीओ कार्यालायाच्या मते ती पावती बनावट आहे.
मकसूद खान यांनी केलेल्या आरोपाचं आरटीओ कार्यालायानं खंडन केलं आहे. अधिकाऱ्यांच्या मते ही पावती बनावट आहे आणि त्यांच्या पावतीत दाखवलेल्या कराची रक्कम ही त्यांनी खरेदी केलेल्या डस्टर गाडीची नसून ती दुसऱ्याच एका सफारी गाडीची आहे. त्यामुळे त्यांना नोटीस पाठवली आहे. मात्र पावतीवरील गाडीचा नंबर हा मकसूद खान यांच्या गाडीचा आहे, मग ही पावती बनावट कशी हा प्रश्न आहे.
काय आहे आरटीओ घोटाळा?
औरंगाबाद आरटीओ कार्यालयात गाड्यांच्या पासिंगसाठी संगणकीय प्रणाली आहे.
मात्र इथं 240 गाड्यांचं मॅन्युअली पासिंग केलं
प्राथमिक चौकशीत 15 गाड्यांचं कर न भरताच पासिंग करण्यात आलं
यात 14 लाखांची फसवणूक झाली आहे.
संगणकीय पद्धती असताना देखील मॅन्युअली पासिंग कोणाच्या सांगण्यावरुन केली. यात दोन अधिकाऱ्यांचा पासवर्ड कसा काय वापरला गेला, प्रत्येक वर्षी ऑडिट होत असताना हा घोळ लक्षात येण्यासाठी तीन वर्ष का लागली, काही राजकीय व्यक्तींना कर बुडवण्यात मदत करणारे कोण अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत, अशा अजून किती गाड्या आहेत ज्यांनी आरटीओ कार्यालयाचा कर बुडवला आहे, हे सवाल कायम राहतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement