एक्स्प्लोर

कचरा उचलण्यासाठी औरंगाबादकरांना आता कर भरावा लागणार

गेल्या चार महिन्यांपासून शहराची कचऱ्याने नाकेबंदीच केली आहे. महापालिकेने अनेक प्रयत्न केले, मात्र सगळेच निष्फळ ठरले. त्यात आता एक नवा फंडा काढलाय. आता शहरातील कचरा उचलण्यावर कर लावण्यात येणार आहे.

औरंगाबाद : कचराकोंडीत फसलेल्या औरंगाबादेत आता कचऱ्यावर कर लागणार आहे. घरातील, घरासमोरचा, दुकानातील सगळ्याच कचऱ्यावर महापालिका ग्राहक कर लावणार आहे. स्वच्छचा कराच्या माध्यमातून मिळणारा पैसा पुरेसा नाही. त्यामुळे या माध्यमातून महापालिका कर जमा करून कचरा निर्मूलनासाठी वापरणार आहे. कचराकोंडीने औरंगाबाद शहराची वाट लागली आहे. गेल्या चार महिन्यांपासून  शहराची कचऱ्याने नाकेबंदीच केली आहे. महापालिकेने अनेक प्रयत्न केले, मात्र सगळेच निष्फळ ठरले. त्यात आता एक नवा फंडा काढलाय. आता शहरातील कचरा उचलण्यावर कर लावण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार नागरिकांकडून ग्राहक शुल्क आकारणी करण्यात येईल. कसा असेल कर? निवासी घरातून दिवसातून एक वेळ कचरा उचलण्यात येईल आणि एक रुपया प्रतिदिन कर लागेल, वर्षाला 365 रुपये छोटे व्यावसायिक यांचा दोन वेळा कचरा घेण्यात येईल, प्रतिदिन दोन रुपये कर लावण्यात येईल, वर्षाला 730 रुपये हॉटेल्स, मोठे व्यावसायिक यांच्याकडून 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत कर आकारण्यात येईल. यामाध्यमातून शहरातील दोन लाख 20 हजार घरं आणि 22500 व्यावसायिक आस्थापनांमधून वर्षाचे 10 कोटींचे उत्पन्न अपेक्षीत आहे. स्वच्छता कर वसूल केला जातोय, मात्र त्यातून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही. म्हणून या नव्या कराचा फंडा महापालिका आता राबवणार आहे. व्यापाऱ्यांचा कराला विरोध दुसरीकडे व्यापाऱ्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने चर्चेविनाच कर लावण्याचा सपाटा लावलाय. स्वच्छता कराच्या माध्यमातून आम्ही कर भरतच असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. कराच्या माध्यमातून आता महापालिका शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर महापालिका स्वतः जे काही करते त्यातून शहर कचरामुक्त करणं त्यांना अजूनही शक्य झालं नाही. त्यात आता या अशा पद्धतीने कर लावून महापालिका नक्की काय साध्य करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांची बैठक, न्यायालयात जाणार, सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget