एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चिमुकली वडिलांसाठी टाचा वर करुन, हातात सलाईन घेऊन उभी!
त्यानंतर डॉक्टरांनी सलाईनची बाटली त्यांच्या मुलीच्या हातात दिली.
औरंगाबाद : औरंगाबादमधील घाटी या शासकीय रुग्णालयाची दयनीय अवस्थ दर्शवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. ऑपरेशन झालेल्या वडिलांना सलाईन मिळावी, यासाठी सहा-सात वर्षांची चिमुकली आपल्या पायाच्या टाचा वर करुन सलाईनची बाटली हातात धरुन उभी होती.
तब्बल अर्धा तास ही मुलगी आणि तिचा भाऊ सलाईन हातात घेऊन उभे होते. मग मुलीच्या भावाने आयव्ही स्टँड शोधला, तेव्हा कुठे दोघांची सुटका झाली.
औरंगाबादच्या खुलताबाद तालुक्यातील भटजी गावातील एकनाथ गवळी हे शनिवारी घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सोमवारी त्यांचं ऑपरेशन झालं. त्यानंतर डॉक्टरांनी सलाईनची बाटली त्यांच्या मुलीच्या हातात दिली. ऑपरेशन थिएटरपासून ते वॉर्ड क्रमांक 19 पर्यंत सलाईनची बाटली मुलीच्या हातातच होती.
वॉर्डमध्ये पोहोचल्यानंतरही 15-20 मिनिटं ही मुलगी आपल्या पायाच्या टाचा वर करुन वडिलांना सलाईनचा पुरवठा नीट व्हावा म्हणून तशीच उभी होती. रुग्णालयात आयव्ही स्टॅण्ड न मिळल्याने हातात सलाईची बाटली धरण्याची वेळ मुलीवर आली.
दरम्यान, आई नसल्याने मुलगी आणि तिचा भाऊ गेल्या तीन दिवसांपासून वडिलांची काळजी घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
Advertisement