एक्स्प्लोर
धुळ्यात दोन गटातील हाणामारीत PSI गंभीर जखमी

धुळे : साक्रीत दोन गटांच्या हाणामारीत पोलिस उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले गंभीर जखमी झाले आहेत. हुंडा प्रकरणातील आरोपींना जामीन मिळाल्यानं दोन गटात साक्री पोलिस ठाण्यात मोठा वाद पेटला. जमावाला शांत करण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रेमनाथ ढोले यांना यावेळी जमावानं जबर मारहाण केली. धुळे जिल्ह्यातील साक्री पोलीस ठाण्यात हुंडा प्रकरणातील आरोपीला जामीन झाल्याच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला. विशेष दोन्ही बाजूचे गट पोलीस ठाण्यातच एकमेकांना भिडले आणि वाद विकोपाला गेला. एका गटाने लाठ्या-काठ्यांसह दगडांचा वापर केला. यावेळी साक्री पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रेमनाथ ढोले जमावाला शांत करण्यासाठी गेले. मात्र, यादरम्यान प्रेमनाथ ढोलेंना दगड आणि काठीचा जबर मार लागला. पीएसआय प्रेमनाथ ढोले हे मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. या वादातील आरोपी फरार असून, मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
Before You Go
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















