एक्स्प्लोर
वाढदिवसाची वर्गणी न दिल्याने हॉटेलवर हल्ला, मॅनेजरला बेदम मारहाण

लातूर : पँथर संघर्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसाला पैसे दिले नाही म्हणून लातूर येथील गुरु हॉटेलवर चार ते पाच जणांच्या टोळीने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात हॉटेलचे मॅनेजर विलास जोशी जखमी झाले आहेत. हातात लोखंडी रॉड आणि चाकू घेऊन आलेल्या या टोळक्याने हॉटेलचे मॅनेजर विलास जोशी यांना डोक्यात जबर मारहाण केली. पँथर संघर्ष संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसाला पैसे दिले नाहीत या कारणामुळे ही मारहाण करण्यात आली. हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण करुन परत जाणाऱ्या या टोळीतील दोन जणांना पकडलं. मारहाणीचा हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यात मार लागलेल्या मॅनेजर विलास जोशी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली आहे. विवेकानंद पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार देण्यात आली असून यातील दोन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
Before You Go
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















