एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अॅट्रॉसिटी रद्दच्या मागणीऐवजी, आरोपींच्या फाशीची मागणी करा: आठवले
सांगली: 'मराठा समाजानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी करण्याऐवजी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या फाशीची मागणी करावी.' असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलं. सांगलीत पार पडलेल्या एका सत्कार समारंभात ते बोलत होते.
औरंगाबाद, उस्मानाबाद आणि परभणीमध्ये मराठा समाजानं विराट मोर्चा काढून मोठं शक्तीप्रदर्शन केलं. या मोर्च्यांनंतर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, ही मागणी अयोग्य असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं आहे.
सांगलीत झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते. तर कार्यक्रमाला गैरहजेरी लावणाऱ्या पतंगराव कदम आणि जयंत पाटलांना रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून टोला हाणला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
निवडणूक
क्रीडा
राजकारण
Advertisement