एक्स्प्लोर

खंडणीसाठी मित्रानेच केलं मित्राचं अपहरण! अथर्व मनोरे हत्या प्रकरणातील महत्वाची अपडेट समोर, तीन आरोपींना अटक

नागपुरातील 14 वर्षीय अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Atharva Manore Murder Case :   नागपुरातील 14 वर्षीय अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणासंदर्भात (Atharva Manore Murder Case)  महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन्ही आरोपांचे वय 19, 20 आणि 22 वर्षे आहे. शेजारी राहणाऱ्या जयराम गोपाल यादव या मित्रानेच खंडणीसाठी अपहरण केलं होतं. आरोपी केतन उर्फ कुणाल रमेश शाहू आणि आयुष मोहन शाहू या दोघांच्या मदतीनं हे अपहरण केलं होतं. 40 ते 50 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलं होतं, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र शिंघल यांनी दिली आहे. 

शंका येऊ नये म्हणून हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून अथर्व मनोरे याचे अपहरण

20 दिवसांपासून अपहरणाचा प्लॅन सुरु होता. कोणालाही शंका येणार नाही म्हणून हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून अथर्व मनोरे याचे अपहरण केलं होतं. पण अथर्व बेशुद्ध होत नव्हता, त्यामुळे त्याला मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला. गट्टीखदान पोलीसांनी आज पहाटे तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीसांकडून आरोपींची चौकशी सुरु करण्यात आली आहे. नागपूरात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अथर्व ननोरेची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून 14 वर्षीय अथर्वचं अपहरण झालं होतं. शनिवारी  दुपारी भरतवाडा परिसरात अथर्वचा मृतदेह आढळून आला होता. 

अर्थवच्या शेजारी राहणाऱ्यांसह त्याच्या मित्राचाही समावेश असल्यानं खळबळ

अथर्व मनोरे याच्या मृतदेहची देखील विटंबना करण्यात आलेली होती. त्यामुळं अथर्वसोबत नेमकं काय घडलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. डोकं चक्रावणारी बाब म्हणजे या आरोपींमध्ये अर्थवच्या शेजारी राहणाऱ्यांसह त्याच्या मित्राचाही समावेश आहे. अर्थव मनोरेची अत्यांत भयानक रित्या हत्या झाली यावर स्थानिकांनी आंदोलनं केली होती तसेच विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. या प्रकरणावर जलद कारवाई करत स्थानिक पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी अथर्वच्या कुटुंबाकडून तब्बल 40 ते 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा डाव आखला होता. अपहरण केल्यानंतर त्यांनी अथर्वला एका ठिकाणी ठेवलं होतं. मात्र, अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. यामध्येच त्याचा मृत्यू झाला होता. 

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! जावयानं केली सासऱ्याची हत्या, स्वतःही केला आत्महत्येचा प्रयत्न, सोलापुरात खळबळ

 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget