एक्स्प्लोर
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : मुख्य आरोपीचे पदोन्नतीच्या यादीत नाव
हत्या प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या आरोपी अभय कुरुंदकरचे पदोन्नतीच्या यादीत नाव आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
कोल्हापूर : महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी निलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर याचे चक्क पदोन्नतीच्या यादीत नाव आले आहे. हत्या प्रकरणात जेलमध्ये असणाऱ्या आरोपी अभय कुरुंदकरचे पदोन्नतीच्या यादीत नाव आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
शासनाकडून 28 जूनला काढण्यात आलेल्या परिपत्रकात अभय कुरुंदकरचे नाव पोलीस उप-अधीक्षकाच्या निवड सुचीत 228 व्या क्रमांकावर तर 1 जानेवारी 2016 च्या यादीत सेवा ज्येष्ठतेसाठी 856 व्या क्रमांकाचे आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपी अभय कुरुंदकरला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप अश्विनी बिद्रे यांच्या नातेवाईकांनी वारंवार केला होता. आता जेलमध्ये असणाऱ्या या आरोपीचे पदोन्नतीच्या यादीत नाव आल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हेतूवर संशय घेतला जात आहे.
संबंधित बातम्या :
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण, कोणत्या आरोपीने काय केलं?
अश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचे तुकडे वसई खाडीत फेकले, आरोपीची कबुली
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुरुंदकरला वाचवण्याचा प्रयत्न, बिद्रे कुटुंबीयांचा आरोप
अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरण : पोलीस अधिकारी कुरुंदकर अटकेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
नागपूर
Advertisement