एक्स्प्लोर

Sanjay Raut: काँग्रेस अजरामर असलेली म्हातारी, ती कधी मरणार नाही; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनामा देणे आणि तो राजीनामा शंकरराव चव्हाण यांच्या सुपुत्रांनी दिला असेल, तर याचा अर्थ मुलनं आईला नाकारलं असा आहे. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut मुंबई : काँग्रेस पक्षाच्या (Congress)  प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनामा देणे आणि तो राजीनामा जर का शंकरराव चव्हाण यांच्या सुपुत्रांनी दिला असेल, तर याचा अर्थ मुलनं आईला नाकारलं असा तो होईल. काँग्रेस (Congress) ही अजरामर असलेली म्हातारी आहे. ती कधीही मरणार नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी दिली आहे.

अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे कुठे गेले, याबद्दल त्यांनी अजून पर्यंत आपली भूमिका स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे एवढं खळबळ करण्याचे कोणतेही कारण नाही. अशोक चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य काँग्रेस (Congress) पक्षात गेले आहे. आज अशोक चव्हाण जे काही आहेत ते काँग्रेस पक्षामुळेच आहेत. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे देखील संजय राऊत म्हणाले.  

जलसिंचन घोटाळ्याप्रमाणे आदर्श घोटाळा पवित्र

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसच्या पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी ते बोलतांना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आदर्श भ्रष्टाचार घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना तुरुंगात टाकण्यासाठी जंगजंग पछाडले होते. आता जर भारतीय जनता पक्षाला जलसिंचन घोटाळ्या प्रमाणे आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल तर आम्ही देखील पाहू पुढे काय होतं ते. मात्र अशोकरावांवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते असे करणार नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले. 

 कालपर्यंत अशोकराव चव्हाण आमच्यासोबतंच होते. काल जागा वाटप संदर्भातील महाविकास आघाडीच्या बैठकीला देखील ते उपस्थित होते. मराठवाड्यातील काही जागांसाठी त्यांची आग्रही भूमिका होती. त्याच्यामुळे ते आमच्यातच आहेत, अशी मी आशा बाळगतो. पण जरी कोणाला वाकडी पावले टाकायचे असतील तर बघू पुढे काय होतं ते. अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांचं पहिलं ट्विट

आज सोमवार, दि. 12 फेब्रुवारी 2024 रोजी मी 85-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्याकडे दिला आहे, असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Maharashtra CM : फडणवीसांची नेतेपदी निवड,सभागृहात काय काय घडलं? UNCUT VIDEODevendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget