Ashish Shelar Tweet : आशिष शेलार हे तुम्हाला शोभतंय का, हीच भाजपची संस्कृती? ट्वीटरवर युजर्सची संतप्त प्रतिक्रिया
Ashish Shelar Tweet : आशिष शेलार यांनी बलात्कार पीडितेच्या विरोधात भूमिका घेत, तिच्यावरील अत्याचाराला योग्य ठरवले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Ashish Shelar Tweet : राजकारणासाठी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक करण्यासाठी राजकारणी सोशल मीडियाचा आधार घेतात.अनेकदा आपली,पक्षाची भूमिका लोकांमध्ये थेट पोहचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करतात. मात्र, मुंबई भाजपचे (BJP Mumbai) अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी बलात्कार पीडितेच्या विरोधात भूमिका घेत, तिच्यावरील अत्याचाराला योग्य ठरवले असल्याची संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी, एक फेब्रुवारी रोजी रायगड दौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या वेळी उद्धव यांनी जाहीर सभांना संबोधित केले. यावेळी ठाकरे यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?
आशिष शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बिल्कीस बानो यांचा वकालतनामा घेतलाच असल्याची टीका केली. या मुद्याद्वारे ठाकरे यांनी मुस्लिम समुदायाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला. शेलार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...! रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते
रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...!
आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत का? त्याचीही एकदा चौकशी करुन.. बघून या!!
अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...!
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 1, 2024
रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!!
वा!
आम्ही सकाळीच म्हटले होते
रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...!
आता रायगडमधेच आहात तर
हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत… https://t.co/kDEJhwwQ2G
शेलार यांच्यावर संतप्त टीका
आशिष शेलार यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बलात्कार्यांच समर्थन करत आहात, असा सवाल एका युजरने विचारला.
लाज वाटू द्या शेलार ....
— गद्दारनाथ शिंदे (@YZ_Andhbhakt) February 1, 2024
बलात्कार्यांच समर्थन करत आहात ...
आणि वरून पिन ट्विट करत आहात...
एका युजरने शेलार यांना छत्रपती शिवराय यांची आठवण करून देत कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या प्रसंगाची आठवण करून दिली आहे.
जनाब कुरेशिजी
— प्रविण म्हापसेकर (@PraveenMhapsekr) February 1, 2024
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मातेसमान मानून सन्मान करणाऱ्या छत्रपतींचा वारसा आहे ह्या मातीला.
बदफैली केली म्हणून रांझा पाटलांचा चौरंग केला होता महाराजांनी, तुम्हाला नाही पेलवणार हा वारसा त्यासाठी "ठाकरे" घरण्यातच जन्म घ्यावा लागतो.
....बाकी कॉमेंट तर वाचत असलाच,…
बिल्कीस बानो वर झालेले पाशवी अत्याचार मानवतेला लाज वाटेल असे होते. याचा तुम्हाला फरक नाही पडणार कारण तुमचा आणि मानवतेचा संबंधच येत नाही. हो ना?
— भाविका (@BhavikaRaka) February 1, 2024
रायगडावरील माझ्या राजाने अश्या नराधमांना काय शिक्षा दिलीय इतिहासात हे वाचा.
आणि बलात्कारी बाहेर आल्यावर पेढे वाटणं सगळ्यांना नाही जमत.
बिलकीस बानोचा तिच्या चिमुकल्या मुलीसमोर सामूहिक बलात्कार झाला, नंतर त्या चिमुकलीला भिंतीवर धडकून मारले, तिच्या परिवारातील ७ जणांची मुंडकी नसलेले शव मिळाली, बलात्कारा नंतर तिला मरण्यासाठी सोडून दिले. उद्धव ठाकरेंनी तिच्यासाठी न्याय मागितला. निर्लज्ज असण्याची एक पातळी असते. लाजा. https://t.co/4BKGeNotou
— Pr@thamesh🌈 (@prathameshpurud) February 1, 2024
शेलार यांच्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असताना शेलार यांनी उशिरापर्यंत कोणतेही भाष्य केले नाही.