Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


संत गजानन महाराजांच्या पालखीचा आज डिग्रस येथे मुक्काम 


शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली आहे. अत्यंत शिस्तबद्ध पालखी समजल्या जाणाऱ्या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सकाळी श्री क्षेत्र नरसी (नामदेव) येथून प्रस्थान झाले. 6 जूनला शेगाव येथून ही पालखी निघाली. भक्तिमय वातावरणात भक्तांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पालखीचा आजचा मुक्काम डिग्रस या ठिकाणी असणार आहे. उद्या पालखी श्री क्षेत्र ओंढा नागनाथ येथून प्रस्थान करेल. तर, रात्री पालखीचा मुक्काम जवळा बाजार येथे असणार आहे. 


माता रूक्मिणीच्या पालखीचा आज कण्हेरगाव नाका, जि. हिंगोली येथे मुक्काम 






 







संत मुक्ताईच्या पालखीचा आज काजळफाटा येथे मुक्काम




यंदाच्या आषाढी वारीसाठी संत मुक्ताईच्या पालखीचे 3 जूनपासून प्रस्थान झाले. जळगाव येथील कोथळी गावातील संत मुक्ताईचे जुने मंदिर म्हणजेच समाधी स्थळापासून हा पालखी सोहळा मोठ्या उत्साहाने संत मुक्ताईच्या जयघोषात पंढरपूरला रवाना होण्यास सज्ज झाला आहे. त्यानुसार आज पालखी काजळफाटा मुक्कामी असणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी 18 जून रोजी ही पालखी शेवगांव पाटी येथे प्रस्थान करेल, तर रात्रीचा मुक्काम अंबड या ठिकाणी असणार आहे. 


संत निवृत्तीनाथ पालखीचा आज खंबाळे येथे मुक्काम 


संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा सोहळा 13 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करण्यासाठी निघाला. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेली पालखी आज खंबाळे मुक्कामी असणार आहे. तर, उद्या म्हणजेच 18 जून रोजी पालखी सकाळी खंबाळेहून प्रस्थान करेल. त्यानंतर रात्री पारेगांव येथे पालखीचा रात्रभर मुक्काम असणार आहे. यंदाची वारी ही कोरोना निर्बंधमुक्त असल्याने मनसोक्त विठुरायाचे पाहता येणार आहे. 


महत्वाच्या बातम्या :