मुंबई : राज्यात जून  महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे.  गेल्या तीन दिवसापासून रुग्णसंख्या ही चार हजारपार जात आहे. शुक्रवारी राज्यात 4165  रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील 2255  रुग्ण हे मुंबईतील आहे आहे. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब  आहे.


मुंबईकरांची चिंता वाढली


आज राज्यात 4165 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 3047 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज 2255 रुग्णांची नोंद झाली आहे.  राज्यात आज कोरोनाच्या तीन  मृत्यूची नोंद झाली आहे. 


आज तीन कोरोना मृत्यूची नोंद


राज्यात आज एकूण 3047 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,58, 230  जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 97. 86टक्के इतकं झालं आहे. राज्यात आज तीन कोरोना मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला आहे. 


सक्रिय रुग्णसंख्या वाढली


राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण  21749 सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे 13304 इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये 4442 इतके सक्रिय रुग्ण आहेत.


 देशात कोरोनाचे 12 हजार 847 नवे रुग्ण


भारतात 12 हजार 847 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोनाच्या संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स व्हायरसच्या धोक्यामुळेही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशात गुरुवारी दिवसभरात 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर, 7 हजार 985 रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.