Ashadhi Wari 2022 : कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पालखी सोहळा सुरु झाला आहे. यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळे भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 6 जूनला गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं. तर, 3 जूनला संत मुक्ताईचा आणि रूक्मिणी मातेचा पालखी सोहळा सुरु झाला. पालखीचा हा मुक्काम आज नेमका कुठे असणार आहे? तसेच संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचा पालखी सोहळा कधी असणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
गजानन संत महाराजांच्या पालखीचा आज अकोला येथे मुक्काम
यंदाच्या आषाढी वारीसाठी 6 जूनपासून शेगावहून संत गजानन महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले. त्यानुसार आज दुपारी अकोला येथे पालखीचे प्रस्थान असणार आहे. तर, याच ठिकाणी रात्री पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी 10 जून रोजी ही पालखी भरतपूर येथे प्रस्थान करेल, तर रात्री वाडेगांव याच ठिकाणी रात्रभर पालखीचा मुक्काम असणार आहे.
माता रूक्मिणीच्या पालखीचा आज लोणी, टाकळी येथे मुक्काम
माता रूक्मिणीच्या पालखीची सुरुवात 3 जून रोजी सुरु झाली. हा पालखी सोहळा कौंडण्यपूर येथून प्रस्थान करण्यात आला. त्यानुसार आज सकाळी जुनी वस्ती बडनेरा येथून प्रस्थान झाले. तर, आज रात्री लोणी, टाकळी येथे पालखीचा मुक्काम असणार आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी 10 जून रोजी ही पालखी सकाळी लोणी टाकळी येथून प्रस्थान करेल. तर, रात्री धनज, ता. कारंजा लाड, जिल्हा वाशीम येथे रात्रभर पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत मुक्ताईच्या पालखीचा आज बुलढाणा येथे मुक्काम
संत मुक्ताई यांच्या पालखीचं आज बुलढाण्यात आगमन झालं. तत्पूर्वी संत मुक्ताई पालखी राजूर घाटातून विठ्ठलाच्या नामजपात भर उन्हात आली. दोन वर्षांच्या कोरोना कालखंडानंतर मुक्ताईची पालखी बुलढाणा शहरात आल्याने भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. बुलढाण्यात जागोजागी पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं असून आज पालखीचा बुलढाणा येथे मुक्काम आहे. तर, उद्या सकाळी ही पालखी बुलढाणा येथून प्रस्थान करून रात्री येळगाव येथे पालखीचा मुक्काम असणार आहे.
आगामी पालखी सोहळे :
13 जून : संत निवृत्तीनाथ पालखी
20 जून : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
21 जून : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
महत्वाच्या बातम्या :
- गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; 700 भाविक 5 जिल्हे, 750 किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहचणार
- Ashadhi Wari 2022 : संत मुक्ताईची पालखी आज भालेगांव मुक्कामी; तर माता रूक्मिणीच्या पालखीचा कुऱ्हा येथे मुक्काम
- Ashadhi Wari 2022 : गजानन महाराजांच्या पालखीचे उद्या प्रस्थान; असा असेल पालखीचा मार्ग