Vitthal Rukmini Ashadi Ekadashi 2021 Live Updates : मानाच्या पालखीतील वारकऱ्यांना एकादशीचे दर्शन मिळणार का? मंदिर प्रशासन समितीशी चर्चा करून निर्णय देणार

Vitthal Rukmini Ashadi Ekadashi 2021 Live Updates : आज आषाढी एकादशी. दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे.

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 20 Jul 2021 07:15 PM

पार्श्वभूमी

Vitthal Rukmini Ashadi Ekadashi 2021 Live Updates : दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...More

मानाच्या पालखीतील वारकऱ्यांना एकादशीचे दर्शन मिळणार का? मंदिर प्रशासन समितीशी चर्चा करून निर्णय देणार

मंदिर समिती आणि मानाचे सोहळे प्रमुख यांच्या बैठकीत तोडगा. आज गावातील स्थानिक 195 मठाधिपती यांना देवाचे मुख दर्शन देण्यात आले होते. मात्र, मानाच्या पालखीतील वारकऱ्यांना आजच एकादशीचे दर्शन हवे होते. या वारकऱ्यांना पौर्णिमेला देव संत भेटीच्या वेळी दर्शन देण्याचे ठरले होते. आता मंदिर प्रशासन समितीशी चर्चा करून या वारकऱ्यांना निर्णय देणार आहे.