जळगाव : रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्शवभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला कल वाढवला आहे. त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली असून दरही विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात घमासान युद्ध सुरु आहे. त्यात रशियाने अणु युद्धाची धमकी दिल्याने त्याचा परिणाम म्हणून जागतिक बाजारपेठेत पाहायला मिळतो. सर्वच ठिकाणी शेअर बाजार कोसळले आहेत. त्यातल्या त्यात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात असल्याने जगभरात सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे कल वाढला आहे


त्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन किंमतीही मोठ्या उंच पातळीवर जाऊन पोहोचल्या आहेत. जळगावच्या सुवर्णनगरीत याचा सोन्याच्या दरात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली असल्याचं दिसून येत आहे. शुद्ध सोन्याच्या दहा ग्रॅमसाठी आज जळगावच्या सुवर्ण नगरीत जीएसटीसह 55, 400 रुपये इतका विक्रमी भाव यंदाच्या मोसमात मिळत आहे.


सोन्याचे दर सर्वसामान्य जनतेचा आवाक्या बाहेर असले तरी सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता आजची सोने खरेदी ही फायदेशीर ठरु शकेल, अशी शक्यता लक्षात घेता अनेकांनी वाढत्या किमतीत सोने खरेदी ला प्राधान्य दिलं आहे. सोन्याचे दर काहीही असेल तरी शेवटी हौसेला मोल नाही आणि सोन्यामधील गुंतवणूक ही नेहमीच फायदेशीर ठरत असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी यावेळी दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या