Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सतत वाढ होत आहे. आज गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार जर सोन्याचा दर पाहिला तर यामध्ये काहीही फरक दिसून येत नाही. दोन दिवसांपूर्वी सोन्याचा जो दर होता तोच दर आजही बाजारात आहे. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदी करण्याची चांगली संधी आहे. नेमके काय आहेत आजचे ताजे दर ते जाणून घ्या.
सोन्या-चांदीचे आजचे दर :
आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 49,550 रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 54,060 रूपये झाला आहे. तर 1 किलो चांदीचा दर 69,100 रूपये आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.73 टक्क्यांनी किंवा 286 रुपयांनी वाढून 53,378 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीचे वायदेही 1.31 टक्क्यांनी वाढून 901 रुपयांनी 69,100 रुपये प्रति किलोवर पोहोचले.
जागतिक बाजारपेठेत आजचा दर :
स्पॉट गोल्ड 0.5 टक्क्यांनी वधारून $1,984.58 प्रति औंस वर होते, जे 14 मार्च नंतरचे उच्चांक गाठले. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.7 टक्क्यांनी वाढून $1,987.70 वर होते.
तुमच्या शहराचे दर तपासा :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
महत्वाच्या बातम्या :