Home Minister Dilip Valse Patil : भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत. पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावं असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, 'पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येईल. मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. यामध्ये सूचना जारी करण्यात येईल.' गृहमंत्र्यांनी यावेळी जनतेला आवाहन केलं आहे की, 'कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती, संघटना किंवा इतर कोणीही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.'
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भोंग्यावरुन राज्यभरात वातावरण तापलं असताना राज्य सरकारनेही हालचाली सुरू केल्या आहेत. भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी गृहखात्याने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सर्व जिल्हा पोलीस प्रमुखांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत धार्मिक स्थळांना भोंग्यासाठी परवानगी अनिवार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय, भोंग्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे.
भोंग्याच्या मुद्यावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने 3 मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर आता संभाव्य तणाव टाळण्यासाठी गृहविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील प्रार्थनास्थळांना भोंगे लावण्यासाठी परवानगी घेणे अनिवार्य असणार आहे. त्याशिवाय, राज्यभर भोंग्यांसंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचनांचं कटाक्षानं पालन करण्याचे आदेश दिले जाणार असल्याची माहिती गृहखात्यातील सूत्रांनी दिली.
मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय
सध्याची परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबईत जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे. यामुळए आता सोशल मीडियाचा वापर करत सामाजित तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येतेत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे 3000 पोस्ट डिलीट केल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Breaking : सामाजिक तेढ निर्माण करण्यांना बसणार चाप, मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब सक्रिय
- Loudspeaker Controversy: भोंग्याचा वाद: राज्य सरकार 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
- Delhi Violence : जहांगीरपुरी दगडफेक प्रकरणात 21 जणांना अटक, दोन आरोपी अल्पवयीन, पिस्तूलांसह तलवारी जप्त; जाणून घ्या प्रकरण
- Lakhimpur Accident : भाजप आमदाराच्या गाडीनं दुचाकीस्वार भावांना उडवलं, दोघांचा मृत्यू
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha