एक्स्प्लोर
धुळ्यात पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

धुळे : धुळ्यात पेट्रोल पंपवर सशस्त्र दरोडा पडला असून, दरोडेखोरांच्या मारहाणीत मारहाणीत पेट्रोलपंपवरील पोकलँड चालकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. धुळे शहराजवळील सुरत -नागपूर हायवेवरील फागणे गावाजवळ असलेल्या कोयल पंपावर हा प्रकार घडला. पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर हल्ला चढवला. यात दरोडेखोरांनी पंपावरील 10 हजाराची रोकड लंपास केली. यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत पेट्रोलपंपावरील पोकलँड चालकाचा मृत्यू झाला. तर पंपावरील दोन कर्मचारी जखमी झाले. दरम्यान, ही घटना पंपावरील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याच्या आधारे पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.
आणखी वाचा























