एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anna Bhau Sathe Jayanti : 'मागेल त्याला शैक्षणिक साहित्य' उपक्रमांतर्गत गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत, सोलापुरात उपक्रम
सोलापुरातील हॅपी युथ क्लबतर्फे (Solapur Happy Youth Club) अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अनोखा उपक्रम राबविण्यात येतोय.
Solapur News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती (Anna Bhau Sathe Jayanti). साधारणत: जयंती, उत्सव म्हटलं की मोठं मोठे कार्यक्रम, रॅली, मिरवणूक असे भव्य कार्यक्रम केले जातात. मात्र हल्ली काही संस्थांकडून हा ट्रेंड बदलला जात आहे. असाच एक चांगला उपक्रम सोलापुरातील एका संस्थेनं केला आहे. सोलापुरातील हॅप्पी यूथ क्लबतर्फे (Solapur Happy Youth Club) अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने अनोखा उपक्रम राबविण्यात येतोय. 'मागेल त्याला शैक्षणिक साहित्य' हा स्तुत्य उपक्रम या संस्थेमार्फत केला जातोय.
विशेष म्हणजे ज्यांनी यासाठी नोंदणी केलीय त्यांना हॅप्पी यूथ क्लबतर्फे घरपोच हे शैक्षणिक साहित्य पुरवले जाणार आहे. या उपक्रमाची औपचारिक सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पुरवसंध्येला करण्यात आला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीस महागडी पुस्तके देऊन या उपक्रमाची सुरुवात झाली.
अनेकांना परिस्थितीमुळं आपलं शिक्षण पूर्ण करता येत नाही, त्यांच्यासाठी हा उपक्रम
'मातंग समाजात अनेक लोकांची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची आहे. त्यामुळे अनेकांना आपले शिक्षण देखील पूर्ण करता येत नाहीत. याचीच जाणीव ठेवू आम्ही हा उपक्रम घ्यायचं ठरवलं. सोलापुरात कोणताही उत्सव करताना लाखो रुपयांचा खर्च वायफळ केला जातो. मात्र आमच्या सामाजिक संस्थेने विधायक कामाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील मातंग समाज बांधवासाठी हा उपक्रम असणार आहे' अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सोहम लोंढे यांनी दिली.
उपक्रमासाठी 100-150 जणांनी शैक्षणिक साहित्यासाठी नोंदणी
आतापर्यंत या उपक्रमासाठी 100-150 जणांनी शैक्षणिक साहित्यासाठी नोंदणी केली आहे. अगदी लहान गट ते पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. 'नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित आणून मोठा कार्यक्रम घेत शैक्षणिक साहित्य वाटप करता आले असते. मात्र कार्यक्रमासाठी किमान लाख भर रुपये खर्च आला असता. त्या खर्चात आणखी विद्यार्थ्यांचे साहित्य उपलब्ध होईल हा विचार करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर हा उपक्रम राबवित आहोत. जिल्हाभरात लोकांना त्यांच्या घरी जाऊन साहित्य दिले जाईल' अशी माहिती हॅप्पी यूथ क्लब या संस्थेचे अध्यक्ष सोहम लोंढे यांनी दिली. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक उदयसिंह पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत केलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भंडारा
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement