या बँकांनी दावा केला आहे, की रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉमला 2012 मध्ये 92.52 कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. हे कर्ज न फेडल्याने हा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, अनिल अंबानींचे वकील रॉबर्ट हॉवने न्यायालयात बाजू मांडताना म्हटलं आहे, की मुकेश अंबानी यांनी कधीच पर्सनल गँरंटी दिली नाही. दरम्यान, भारतीय विमा नियामक मंडळ इरडाने रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून नवीन पॉलिसी विकण्यावर बंदी आणण्यात आली आहे. ही कंपनीही आर्थिक संकटात असल्यानं जुन्याच ग्राहकांना सेवा देत राहणार आहे.
याआधीही मुकेश अंबानी आले होते अडचणीत
सुप्रीम कोर्टाने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानींना टेलिकॉम उपकरणं बनवणारी कंपनी एरिक्सनच्या कर्जाची परतफेड करण्याचा आदेश दिला होता. परंतु अनिल अंबानींनी जाणीवपूर्वक परतफेड केली नाही, असं सांगत सुप्रीम कोर्टाने अंबानींना कोर्टाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवलं होतं.
चार आठवड्यात एरिक्सनेचे पैसे परत करा अन्यथा तीन महिने जेलमध्ये जावं लागेल, असं सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टाने रिलायन्स कम्युनिकेशन्सला 550 कोटी रुपये परत करण्यासाठी 19 मार्चपर्यंतची मुदत दिली होती. यानंतर रिलायन्स कम्युनिकेशन्सने कोर्टाच्या आदेशानुसार, एरिक्सनला 550 कोटी रुपये परत केले.
संबंधित बातम्या :
4 आठवड्यात 453 कोटी रुपये द्या, अन्यथा तीन महिन्यांची जेल; अनिल अंबानींना सुप्रीम कोर्टाचा दणका
भावा वाचवलंस... मुकेश अंबानींमुळे अनिल अंबानींची जेलवारी टळली!
अनिल अंबानींकडून काँग्रेस आणि नॅशनल हेरॉल्डविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला मागे