एक्स्प्लोर

दोन वर्षांनी आज आंगणेवाडीची मोठ्या उत्साहात यात्रा; भाविकांची गर्दी उसळण्याची शक्यता

Anganewadi Bharadi Devi Jatra 2022 : कोकणातील सुप्रसिद्ध भराडीदेवीची यात्रा आज होणार आहे. कोरोना संसर्गामुळे दोन वर्ष यात्रेवर निर्बंध असल्याने भाविकांना भराडी देवीचे दर्शन घेता आले नव्हते.

Anganewadi Bharadi Devi Jatra 2022 :  कोरोनाच्या संसर्गामुळे मर्यादित झालेली कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा आज होणार आहे. दोन वर्षानंतर यात्रा सर्वांसाठी खुली झाल्याने भाविकांची गर्दी उसळणार असल्याचा अंदाज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांना कोव्हिड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

मागील वर्षी कोव्हिडचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्याने यात्रा मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरी करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या लाटेचा जोर कमी झाल्याने आणि लसीकरणाचे प्रमाण वाढल्याने यात्रा निर्बंधासह होणार आहे. यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

कोव्हिड नियमांचे पालन करा

आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर तुम्हाला सोशल डिस्टेंसिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. दुकानदार व व्यापाऱ्यांच्या संख्येवर ही मर्यादा घातल्या गेल्या आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच एका वेळी ५० व्यक्तींना अश्या पद्धतीने दर्शन देण्याच्या सूचना प्रशासनाने आंगणे कुटुंबियांना दिल्या आहेत. 

अशी ठरते यात्रेची तारीख

कोकणात जत्रा म्हटलं की उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं. कोकणातील गावागावात वर्षाच्या ठराविक तिथीला प्रत्येक गावात जत्रा भरते. मात्र भराडी देवीच्या जत्रेची तारीख कुठल्या पंचागात अथवा कॅलेंडरमध्ये सापडणार नाही, कारण ती निश्चित नसते. देवीचा कौल मिळाल्यावरच तारीख ठरते. ही तारीख ठरवण्याची प्रथाही उत्सुकतेची आहे. दिवाळीत शेतीची कामं झाली की आंगणेवाडीतील देवीचे मानकरी एका डाळीवर बसतात. यालाच डाळप स्वारी म्हणतात. देवीला कौल लावला जातो. कौल लावून जत्रेचा दिवस निश्चित केला जातो. एकदा निश्चित झालेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही हे सुद्धा आंगणेवाडी यात्रेचे वैशिष्ट्य आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Sindhudurg News : जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal on Maratha Reservation: 'महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार', छगन भुजबळांचा घरचा आहेर; थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा
'महायुतीच्या नेत्यांनी लक्षात घ्यावं, सरकार आणण्यात ओबीसींचा महत्त्वाचा हातभार', छगन भुजबळांचा घरचा आहेर; थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा
Uddhav Thackeray : भाजप खालच्या पातळीला जाऊन डावपेच करुन निवडणुका जिंकतेय; बीडमध्ये पुन्हा भगवा फडकवण्याची तयारी करा, ठाकरेंनी बीडमध्ये दिला कानमंत्र
भाजप खालच्या पातळीला जाऊन डावपेच करुन निवडणुका जिंकतेय; बीडमध्ये पुन्हा भगवा फडकवण्याची तयारी करा, ठाकरेंनी बीडमध्ये दिला कानमंत्र
Rupali Patil Thombare: पुण्यात राहायचं असेल तर संस्कृती समजून घ्या; नाव खराब नको, उत्सवाला गालबोट नको; विद्यानंद बापटांना रूपाली ठोंबरेंनी सुनावलं
पुण्यात राहायचं असेल तर संस्कृती समजून घ्या; नाव खराब नको, उत्सवाला गालबोट नको; विद्यानंद बापटांना रूपाली ठोंबरेंनी सुनावलं
Mumbai Crime News: कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!
कौटुंबिक वादाचा भयावह शेवट, आधी 19 वर्षीय पत्नीला संपवलं, नंतर पतीनेही उचललं टोकाचं पाऊल; मुंबई हादरली!

व्हिडीओ

Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन
Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidyanand Bapat: भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
भावना दुखावल्याच्या प्रकरणी बापटांविरोधात गणेश मंडळे तक्रार दाखल करणार; विद्यानंद बापट म्हणाले, भावना म्हणजे छाती, डोकं नाही दुखायला!
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
ताप आल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं, प्रकृती खालावली अन्...; नाशिकच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
Wrestler Ashwini Paul Death Dharashiv News: कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर
कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांना घेऊन नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी; आता जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर
Pulwama Case NIA: पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
पुलवामा प्रकरणातील आरोपीचा जामीन नाकारला; बहिणीच्या लग्नासाठी केलेला अर्ज, पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होण्याची परवानगी...
Vidyanand Bapat: मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
मारहाणीच्या घटनेनंतर आता एक पाऊल मागे घेणार का? विद्यानंद बापट म्हणाले छे...छे..अजिबात नाही, कारण...
Wrestler Ashwini Mohite Paul Dharashiv News: महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
महाराष्ट्राच्या वाघिणी'चा दुर्दैवी अंत; महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची 3 मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरुन उडी, धाराशिवमधील थरकाप उडवणारी घटना
India Belgium Defence Deal: ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
ड्रोन, रणगाडे, रॉकेट अन् प्रचंड दारुगोळा; भारतीय लष्कराची ताकद वाढणार! भारत- बेल्जियममध्ये 10 मोठे करार
Manoj Jarange Patil Protest: मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
मनोज जरांगेंकडून 11 सप्टेंबरची डेडलाईन, अंतरवालीत हायहोल्टेज ड्रामा; विखे-पाटील, सामंत, लाड यांच्यासमोर रात्री काय काय घडलं?
Embed widget