Amruta Fadnavis : अमृता फडणवीस धमकी प्रकरण, आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस धमकी प्रकरणी अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस धमकी प्रकरणी अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिक्षा जयसिंघानीवर अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न करणे, त्यांना धमकावणं, असे आरोप आहेत. याच प्रकरणी तिला अटक करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने आता तिला जामीन मंजूर केला आहे.  

Continues below advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, अनिक्षा जयसिंघानीला मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. गेल्या सुनावणीत तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडी सुनावल्यानंतर तिच्याकडून त्वरित न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. अमृता फडणवीस यांच्याशी जरी संपर्कात असली तरी अनिक्षा जयसिंघानीचा या प्रकरणाशी कुठलाही थेट संपर्क नव्हता. त्यांचे सुरुवातीपासूनच चांगले संबंध होते. यामुळे कुठे तरी राजकीय हेतूने अनिक्षाला यात गुंतवण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असा युक्तिवाद तिच्या वकिलांकडून करण्यात आला. चौकशी पूर्ण झालेली आहे. यात जास्तीतजास्त जी शिक्षा आहे, ती सुद्धा जामिनास पात्र आहे. त्यामुळे अनिक्षा ही विधी शाखेची विद्यार्थिनी असून ती लॉचं शिक्षण घेत आहे, त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद तिच्या वकिलांनी न्यायालयात केला. हाच युक्तिवाद ग्राह्य धरत मुंबई सत्र न्यायालयाने तिचा जामीन अर्ज मंजूर केला आहे.  

काय आहे प्रकरण?  

एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर अनिक्षा आणि तिच्या वडिलांना अटक करण्यात आली होती. ज्यात आज न्यायालयाने अनिक्षाला जामीन मंजूर केला आहे.

इतर महत्वाची बातमी:

IIT Mumbai Darshan Solanki : मोठी बातमी! IIT मुंबईचा विद्यार्थी दर्शन सोलंकीची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती; महत्त्वाची माहिती आली समोर

         

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola