Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका महिलेने एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी डिझायनर अनिक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. (Amruta Fadnavis files FIR against designer offering Rs 1 crore)

मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिली.


एफआयआरमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की, 18 आणि 19 फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या व्हिडीओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश एका अज्ञात फोन नंबरवरुन त्यांना पाठवले. तिच्या वडिलांसोबत, ती महिला अप्रत्यक्षपणे अमृता यांना धमकी देत होती.


पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 (बी) (षडयंत्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 च्या कलम 8 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 






एफआयआरबद्दल विचारल्यानंतर मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली की, तपास सुरु आहे. परंतु अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत.अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी गायलं देशभक्तीपर गीत; नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर