Unseasonal Rain : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे. दरम्यान, या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यासह परभणीत (Parbhani) जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सध्या गहू, हरभरा, कांदा काढणीचे दिवस आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असल्याचे चित्र आहे.
रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुरा तालुक्यासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या रब्बी पिकांच्या काढणीचे दिवस सुरु आहेत. अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. यामुळे मानवी आरोग्यासही परिणाम होण्याची शक्यता आहे.
परभणीत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी, ज्वारीसह गव्हाला फटका बसण्याची शक्यता
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज परभणी शहरासह परिसरात जोरदार वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस बरसत आहे. परभणीत आज पहाटे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पहाटे चार वाजल्यापासून परभणीत जोरदार वारे सुटले होते. त्यानंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. या वाऱ्यामुळे आणि या पावसामुळे काढणीला आलेला गहू, काढलेला हरभरा, ज्वारीचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
दरम्यान, राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच पिंपरी चिंचवड, सातारा, धुळे, वर्धा या जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
अकोला जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झआला आहे. याशिवाय यवतमाळ जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे जिल्ह्यात कालपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
तर मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणा पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे उकाड्याने हैराणा झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याचीही शक्यता आहे.
18 मार्चपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 15 मार्च ते 18 मार्च या दरम्यान अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामानातील बदलामुळे (Climate Change) शेती पिकांना फटका बसत आहे. अशातच आता पावसाचा (Rain) अंदाज वर्तवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सध्या कांदा, गहू, हरभरा या पिकांची काढणी सुरु आहे. अशातच पाऊस आल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिवसाच्या कमाल तापमानातही दोन अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी बांधवांनी पावसाची शक्यता घेऊन हरभरा, गहू पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: