Navneet Rana : अमरावतीत (Amravati) गेल्या महिन्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यावरून वाद सुरू आहे.  अशातच खासदार नवनीत राणा (Navneet Rana) छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यावरून यूटर्न घेतल्याचं समोर येतंय. येणाऱ्या भविष्यात महाराजांचा पुतळा बसणार हे लक्षात ठेवा..19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तर बसवणार पण तो राजापेठ उड्डाणपूलावर बसणार नाही. असे संकेत यावेळी नवनीत राणांनी दिले आहेत. यावेळी नवनीत राणा यांनी संजय राऊत पत्रकार परिषद ते अमरावती मनपा आयुक्तांवर झालेल्या शाईफेकी संदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आणखी काय म्हणाल्या राणा?


छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय 


खासदार नवनीत राणा यांच्या समर्थकांनी पुतळा बसवला की मनपा आयुक्त त्यावर कारवाई करत पुतळा हटवतात. संबंधित पुतळा अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं. तर राणा यांनी हा आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय असल्याचं सांगत पुतळा बसवणारच, या भूमिकेवर कायम आहेत. 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावर बसणार नाही.. खासदार नवनीत राणा यांनी संकेत दिले आहेत. 


राऊतांची पत्रकार परिषद फक्त फुसका बारच
काल जी शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली,  त्यात फक्त फुसका बारच होता. महिला व बालकल्याण विभागात जे घोटाळे झाले याची चौकशी ईडी मार्फत केली जाईल. अशा शब्दांत राणा यांनी राऊतांवर टीका केलीय. 


आम्ही आग लावणारे नसून आग विझविणारे आहोत..
अमरावतीत दंगल घडली तेव्हा मी आणि आमदार स्वतः गल्ली-गल्लीत फिरून शांततेच आवाहन केलं होतं. शेतकऱ्यांवर बोलणं जर गुन्हा असेन तर आमदार-खासदार आम्ही दोघे गुन्हेगार आहोत. ही सरकार अजूनही खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणाला कसं जेलात टाकण्यासाठी प्रयत्न करत आहे  


पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक : खासदार नवनीत राणा


मनपा आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचं मी समर्थन केलं नाहीये आणि करणार ही नाहीये. अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकीच्या घटनेनंतर खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांनतर खासदार राणा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अटक असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी पोहोचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना कार्यकर्त्यांना भेटू दिलं नाही. यावेळी पोलीस उपायुक्त विक्रम साळी आणि खासदार राणा यांच्यात तब्बल तासभर चर्चा झाली. भेटीनंतर खासदार राणा यांनी पोलीस कोठडीत अटक असलेल्या कार्यकर्त्यांना होत असलेल्या मारहाणीची तक्रार उपयुक्तांना केल्याची माहिती दिली. तसेच राजकीय दबावाखाली आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांवर 307 कलमांतर्गत दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याची तक्रार केंद्राकडे करणार असल्याचं सांगितलं. शहरात इतके मोठे गुन्हे झाले पण अद्यापही त्यांच्यावर कारवाई झाली नाही. एखाद्या व्यक्तीवर जर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्याची चौकशी होते. पण आमदार रवी राणांवर थेट गुन्हे दाखल करण्यात आले. मनपा आयुक्तांवर शाइफेक करणाऱ्यांना अटक न करता निर्दोष लोकांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांना बेदम मारहाणही केली. 
 


नवनीत राणांचे नागरिकांना आवाहन


नवनीत राणांनी नागरिकांना आवाहन आहे की, 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शांततेत साजरी करा. अमरावती शहरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त आहे. आधीच दंगलीमुळे शहरात अशांतता आहे. त्यामुळे आम्ही शहरात शांतता राहील याला प्राधान्य देणार आहोत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 





दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा