एक्स्प्लोर
अमरावतीत नववीतील विद्यार्थिनीवर दोघांकडून अॅसिडफेक
संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास दोघांनी तिला गाठून अॅसिड फेकलं.
अमरावती : अमरावतीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अॅसिडफेक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघा तरुणांनी केलेल्या अॅसिड हल्ल्यात विद्यार्थिनी 12 टक्के भाजली आहे.
मंगळवारी संध्याकाळी अमरावतीच्या मालटेकडी परिसरात ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून आरोपींनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. पीडित विद्यार्थिनी सिद्धार्थनगर भागात राहते.
संबंधित विद्यार्थिनी अमरावतीतील गर्ल्स हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकते. आज संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास दोघांनी तिला गाठून अॅसिड फेकलं.
या हल्ल्यात ती 12 टक्के भाजली असून तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement