एक्स्प्लोर
अमरावतीच्या अय्याशी मुरलीधर बाबाचे अश्लील चाळे सीसीटीव्हीत कैद
अमरावती: अमरावतीमधील मुरलीधर बाबाच्या पर्दाफाश झाला असून त्याचे महिलांसोबतचे अश्लील चाळे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बालयोगी संत मुरलीधर महाराज असं या अय्याशी बाबाचं नाव आहे. चांदूर बाजारमधील एलकी पूर्णा गावात मुरलीदास महाराजाचा मठ आहे. याच मठातील स्नानगृहात बाबानं महिलांशी अश्लील कृत्य केल्याचं उघड झालं आहे.
विशेष म्हणजे स्नानगृहात रेकॉर्ड झालेला हा व्हिडीओ 2015चा असून तो आता व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत 5 ते 6 वेगवेगळ्या महिलांशी मुरलीधर बाबानं अश्लील चाळे केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलाचे जबाब नोंदवून घेतले आहेत. मात्र त्यातील सर्व महिलांनी आपण स्वखुशीनं हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यानंतरही सामाजिक कार्यकर्ते शफीक राजा यानं आसेगाव पोलिसात तक्रार केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement