Navneet Rana Y Plus Security: अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना केंद्रीय गृहामंत्रालयाद्वारे वाय प्लस श्रेणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. राणा या सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अहवाल आहे. यानंतरच त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार वाय प्लस श्रेणी सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली आहे. 


सुरक्षा ताफ्यात असणार 11 कमांडो 


नवनीत राणा यांच्या सुरक्षेत आता 11 कमांडो तैनात असणार आहेत. या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजीचे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्यांचा समावेह आहे. हे सुरक्षा पथक 24 तास खासदार नवनीत रवी राणा यांच्या समवेत राहणार आहेत.      


राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांना केंद्रीय सुरक्षा 


नवनीत राणा यांच्या याआधी केंद्र सरकारने अभिनेत्री कंगना रनौतला वाय प्लस सुरक्षा पुरवली होती. कंगनाने राज्य सरकारविरोधात भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला होता. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत अनेक नेत्यांना तरुंगात टाकण्याचा इशारा देणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना ही केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे.


संबंधित बातम्या :