एक्स्प्लोर

नव्या वर्षात वाहनधारकांच्या खिशाला लागणार कात्री? टोलच्या रकमेत होणार वाढ?

एकीकडे टोलमध्ये होणारी वाढ आणि दुसरीकडे रस्त्याची असणारी दुरावस्था, हे चित्र वर्षानुवर्षे पाहिला मिळत आहे. त्यामुळे टोलवाढीबाबत वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

पुणे / नाशिक :  आधीच पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना नवीन वर्षात वाहन धारकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. कारण टोलमध्ये आणखी वाढ करण्याचा प्रस्ताव सरकार समोर ठेवण्यात आला आहे. टोल वाढवण्यासाठी देण्यात येणारं कारणही आर्श्‍चयकारक देण्यात आलं आहे. सुट्या पैशांमुळे टोलनाक्यांवर वादावादी होते. असे कारण टोल वाढीला देण्यात आले आहे. परंतु, सुट्या पैशांचे टोलवाढीसाठी कारण असले तरी अलिकडे फास्ट टॅग बंधणकारक करण्यात आल्यामुळे सुट्टे पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही तर मग ही टोलवाढ कशासाठी हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

एकीकडे टोलमध्ये होणारी वाढ आणि दुसरीकडे रस्त्याची असणारी दुरावस्था, हे चित्र वर्षानुवर्षे पाहिला मिळत आहे. त्यामुळे टोलवाढीबाबत वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 

सरकार आणि टोल कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार तीन ते चार टक्के दरवाढ केली जाते. परंतु, आता सुट्या पैशांचे कारण देत टोल वाढ करावी अशी मागणी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने केली आहे. आधीचा टोल 67, 73, 82 रुपयांच्या स्वरूपात असेल तर तो यापुढे 70,  80,  90 असा असेल. त्यामुळे सुट्या पैशांमुळे वाद होणार नाहीत असे सरकारने टोलवाढीबाबत नियुक्त केलेल्या समितिने म्हटले आहे. सरकारने या समितीच्या अहवालानुसार टोलवाढ केली तर परत एकदा वाहनचालकांची  लूट होणार आहे. 

खराब रस्ते, सोयीसुविधांचा अभाव असताना देखील वाहनचालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. टोल वसुली जोमात होत असली तरी रस्त्याची कामे मात्र वर्षोनुवर्षे अर्धवट असल्याची अनेक ठिकाणी स्थिती आहे. विधिमंडळ समितीकडून टोल वाढीचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झाला आहे. 

टोलनाक्यावर सोयी सुविधांचा अभाव, स्वच्छतेचा अभाव, भल्या मोठ्या रांगासारखे प्रश्न जैसे थे असताना टोलमध्ये मात्र वाढ होणार यामुळे वाहनधारकांतून संताप व्यक्त होत आहे. सरकार कोणतंही असो महाराष्ट्राला पडलेला टोलचा विळखा वर्षानुवर्ष कायम आहे. या टोलच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशाची माहिती कधीच पारदर्शकतेने दिली जात नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे टोलच्या नावाखाली अक्षरशः लोकांची लूट सुरू आहे. मोठ-मोठ्या खड्यांतून आदळत वाहने पुढे जातात. त्यामुळे टोल वसुलीतून येणारे कोट्यवधी रुपये जतात तरी कुठे? रस्त्यांची  कामेच होणार नसतील तर टोल का द्यावा? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करत आहेत.

फास्ट टॅग नसेल तर वाहनधारकांना दुप्पट दंड आकारण्यात येत आहे. असे असले तरी एकीकडे फास्ट टॅग बंधनकारक आणि दुसरीकडे सुट्या पेशांच्या अडचणीमुळे टोल वाढ या दोन्ही विसंगत बाबी आहेत. फास्ट टॅग असेल तर सुट्या पैशांचा प्रश्न येतोच कुठे? त्यामुळे सरकार या प्रस्तावावर काय निर्णय घेणार याकडे वाहधारकांचे लक्ष्य लागले आहे. 

 एकीकडे टोलवाढीचा प्रस्ताव असताना दुसरीकडे रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. फक्त टोलनाका असलेल्या ठिकाणीच रस्ता चांगला असतो परंतु, नंतर सगळीकडेच खड्डे, सर्व्हिस रोड नसणे, वाहतूक कोंडी अशा अनेक असुविधांचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. 

टोलचे देईपर्यंत होते भाजी खरेदी
टोलवर लागणाऱ्या लांबच्या लांब रांगांमुळे टोलनाक्यांजवळ पेरू, सफरचंद, काकडी एवढेच नाही तर आठवड्याचा भाजीपाला ही खरेदी होईल. कारण भाजी विक्रेत्यांनाही आता माहित झाले आहे की, टोलवर मोठ्या रांगा लागतात आणि त्या कमी होण्यास वेळ लागतो. तोपर्यंत वाहनधारक भाजीपाला खरेदी करू शकतात, असा संताप वाहनधारकांमधून व्यक्त होत आहे.  
महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget