एक्स्प्लोर

Who is Sanjay Pawar : कडवट शिवसैनिक ते राज्यसभा उमेदवार, कोण आहेत संजय पवार?

Rajya Sabha Election 2022 : ठरलं! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवारांची वर्णी. अधिकृत घोषणा अद्याप बाकी. कोण आहेत संजय पवार?

Rajya Sabha Election 2022 : सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे ती, राज्यसभेच्या सहाव्या जागेची. राज्यसभेची (Rajya Sabha) सहावी जागा शिवसेनेचाच उमेदवार लढवणार असल्याची वाच्यता शिवसेना (Shiv Sena) नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. अशातच आज शिवसेना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राज्यसभेबाबत संभाजीराजेंच्या (Sambhajiraje Chhatrapati) भूमिकेबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे. अशातच शिवसेनेनं राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे. कोल्हापूरचे (Kolhapur) जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. आता केवळ संजय पावारांच्या नावाची अधिकृत घोषणा बाकी आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेबाबत गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरु होत्या. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती आणि चंद्रकांत खैरेंसोबतच संजय पवारांचंही नाव चर्चेत आलं. अखेर पक्षानं विश्वास दाखवत जिल्हापातळीवरच्या नेतृत्त्वाला थेट राज्यसभेचं तिकीट दिलं. पण राज्यसभा निवडणुकांमुळे चर्चेत आलेले संजय पवार नेमके आहेत तरी कोण?  

शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत. 

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची पक्षप्रवेशाची ऑफर नाकारली. त्यामुळे शिवसेना उमेदवार देणार हे स्पष्ट झालं होतं. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि संजय पवार यांची नावं आघाडीवर असल्याची माहिती मिळत होती. मंगळवारी टाळ्या आणि शिट्ट्या ऐकायला मिळतील असं सूचक वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. त्यामुळे सहाव्या जागेच्या उमेदवारीसाठी मातोश्रीचा हात कुणाच्या डोक्यावर असणार याची उत्सुकता लागली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून देण्यात आलेल्या पक्ष प्रवेशाच्या निमंत्रणाकडे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पाठ फिरवली. त्यामुळे संभाजीराजेंची पुढची भूमिका काय असेल याकडंही लक्ष लागलं आहे. याच अनुषंगाने शिवसेनेच्या एका बड्या नेत्यासोबत मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची आज बैठक पार पडणार आहे. त्यामुळे संभाजीराजे काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

संधी मिळाली तर आनंदच : संजय पवार 

संभाजीराजेंनी प्रस्ताव नाकारल्यास कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरु होती. यावर बोलताना संधी मिळाली तर आनंदच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली होती. संजय पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं होतं की, "मला पक्षाकडून अद्याप उमेदवारीबाबत सांगण्यात आलेलं नाही. पण माझ्या नावाची चर्चा असल्याचं मी ऐकतोय. मला संधी मिळाली तर आनंदच आहे. सध्या या चर्चेमधेच मी आनंद मानतोय. संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या घराण्याचा आम्ही आदरच करतो. संभाजीराजे छत्रपती यांनी काय करावं? याबाबत मी त्यांना सूचना करणार नाही. माझ्या नावाची चर्चा ही संभाजीराजेंवर दबाव टाकण्यासाठी नाही."

उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो अंतिम असेल : चंद्रकांत खैरे 

संभाजीराजे यांच्या उमेदवारीवरून तिढा सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाचीही चर्चा सुरु झाली होती. पण अचानक शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. अशातच या सर्व घडामोडींवर चंद्रकांत खैरेंनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे निर्णय घेतील तो अंतिम असेल, असं चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे. दरम्यान, संभाजीराजेंनी प्रस्ताव नाकारल्यास खैरेंऐवजी संजय पवारांची चर्चा असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

शिवसेनेचं ठरलं, रस्त्यावरच्या शिवसैनिकाला राज्यसभेत पाठवणार, संजय पवार यांच्या नावावर शिक्का, लवकरच अधिकृत घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget