एक्स्प्लोर

Nitesh Rane : नितेश राणेंचा जामीन फेटाळला, शिवसैनिकांनी फटाके फोडले, 'राणेसाहेब मुलाला हजर करा', वैभव नाईकांचा टोला

Nitesh Rane Bail Rejected : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

Nitesh Rane :  भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. शिवसेनेच्या संतोष परब (Santosh Parab)  हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. दोन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर गुरुवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस व्ही हांडे यांनी जामीन नाकारला. नितेश राणे यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडत आनंद साजरा केला. तर राणेसाहेब मुलाला हजर करा, असे म्हणत वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना टोला लगवाला आहे. 

गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी फटाके फोडले. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले होते. यावेळी कणकवलीचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 

काय म्हणाले वैभव नाईक ?
एखाद्याचा जामीन अर्ज फेटाळला.. हा काही आनंदाचा दिवस नाही. कोर्टाने हा निर्णय दिला आहे. दोन दिवसांपासून नितेश राणे आणि नारायण राणे पोलिसांनी आपल्याला गुंतवलं असल्याचा आरोप करत आहेत.  पण नितेश राणे यांच्याविरोधातील पुरावे कोर्टानेही मान्य केले आहेत. त्यामुळे नारायण राणे यांनी लोकप्रतिनिधी आणि केंद्रीय मंत्री असल्यामुळे कोर्टाचा निर्णय मान्य करावा. कायद्याचा निर्णय मान्य करावा आणि आपल्या मुलाला पोलीस स्थानकात हजर करावे. राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे वैभव नाईक म्हणाले. 

हायकोर्टात जाणे हाच पर्याय - 
हायकोर्टात जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत नितेश राणे पोलिसांसमोर हजर राहणार नसल्याची माहिती राणेंचे वकिल संग्राम देसाई यांनी दिली आहे.  आता न्यायालयाची वेळ संपली आहे. उद्या आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. उद्या आम्ही हायकोर्टात गेलो तरी सुनावणी होण्यास पुढील दोन तीन दिवस जाणार असल्याचे देसाई म्हणाले. त्यामुळे सुनावणी होईपर्यंत नितेश राणे पोलिसांपासून वेगळे राहू शकतात, असे देसाई म्हणाले. आम्हाला तसा कायदेशीर अधिकार आहे. जर हायकोर्टात नाहीच गेलो तर कोर्टात हजर राहण्याचा पर्याय देखील आमच्यासमोर असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. नितेश राणे यांच्याबद्दलची ऑर्डर कॉपी अद्याप आम्हाला मिळालेली नाही. मात्र, न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, त्यांच्याकडे असणारे मोबाईल जप्त करायचे आहेत, त्यामुळे त्यांना अटक करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या बाजून पोलिसांना पूर्ण सहकार्य करत आहोत. गरज पडल्यास आणखी मदत करु असेही ते यावेळी म्हणाले. यापूर्वी नितेश राणे यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य केले होते असेही यावेळी देसाई यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण? 
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

Embed widget