एक्स्प्लोर

केंद्राकडून सूडनाट्य सुरू, क्रियेला प्रतिक्रिया देण्याची मर्यादा पाळावी; जयंत पाटलांचा सेना-भाजपला खोचक सल्ला

Jayant Patil:  केंद्रातील सरकारकडून राज्यावर सूड उगवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच ठाकरे-राणे वादावरही त्यांनी भाष्य केलं. 

सोलापूर: केंद्र सरकारकडून राजकारणाचे सूडनाट्य सुरु असून  क्रियेला प्रतिक्रिया देण्यात येत आहे. पण या गोष्टी मर्यादित ठेवणे आवश्यक असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील म्हणाले. राज्यातील ठाकरे-राणे यांचे नाव न घेता राजकारणात सुरु असलेल्या सूडनाट्यावर जयंत पाटील यांनी भाजप-सेनेला खोचक सल्ला दिला आहे. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय प्रश्नात बोलणे टाळावे असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील म्हणाले की, "महाराष्ट्र कायम सर्वांचा आदर करून काम करणारे राज्य आहे. सर्वांना टोकाची भाषा बोलणे टाळले पाहिजे. सध्या राजकारणात दुसऱ्याचा सूड उगवणे हा नवा प्रकार दिल्लीतील नवे सरकार आल्यापासून सुरु झालेला आहे. त्यामुळे क्रिया-प्रतिक्रिया जास्त उमटायला लागल्या आहेत. दोन्ही बाजूने त्या मर्यादित ठेवल्या पाहिजेत आणि सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन आपण करू नये."

यावेळी केंद्रातील भाजप सरकारवर टीका करताना त्यांच्या क्रियेला प्रतिक्रिया देणाऱ्या राज्यातील सत्तेतील सहकाऱ्यांनाही जयंत पाटलांनी टोले लगावले. सध्या शिवसेनेतील ठाकरे विरुद्ध राणे संघर्षात सुडाचे राजकारण समोर येऊ लागले असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर अतिशय मार्मिक शब्दात वार करताना सार्वजनिक मर्यादांचे उल्लंघन करू नये असा मोलाचा सल्ला देखील दिला आहे.
 
अशोक चव्हाणांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देताना आघाडी सरकारमधील मित्र पक्षांनी एकमेकांच्या पक्षातील नेत्यांना प्रवेश देणे अयोग्य असल्याचे सांगताना फक्त हे पक्ष सोडणारे नेते भाजपमध्ये जाणार नाहीत याची काळजी घेण्याची सूचना जयंत पाटील यांनी दिली. गेल्या काही दिवसापूर्वी काँग्रेसचे काही पदाधिकारी राष्ट्रवादीत गेल्यावर काँग्रेसनेही राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश  दिला होता. 

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या दौऱ्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा जयंत पाटील यांनी जोरदार शब्दात समाचार घेतला. जयंत पाटील म्हणाले की, "नाना पटोले यांनी माहिती घेऊन बोलावे. राष्ट्रीय प्रश्नाबाबत राष्ट्रीय नेत्यांना  बोलू द्यावं. आपण स्थानिक असून आपल्याला दुसऱ्या राज्यातील परिस्थिती फारशी माहित नसते. याशिवाय ही बैठक काँग्रेसला धरून आहे कि सोडून आहे हेही माहित नसते."

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget