एक्स्प्लोर

मिटकरी म्हणाले, भाजपने पैशाने निवडणूक जिंकली, चंद्रकांत पाटील म्हणतात, वा वा वा वा!

Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली होती.

Maharashtra Vidhan Parishad Election 2021 : विधान परिषदांच्या निवडणूक निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. नागपूर आणि अकोला-बुलडाणा-वाशिम विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला. भाजपने या निवडणुकीत महाविकास आघाडीची मते फोडली. भाजपने घोडेबाजार केल्याचा आरोप होत असताना भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या विजयाबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार पलटवार केला. चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तर ईव्हीएम मशीन चांगलं असतं, आसाममध्ये भाजप जिंकले तर ईव्हीएम मशीनमध्ये प्रॉब्लेम असतो. हे जिंकले तर तत्वज्ञान जिंकतं आणि आम्ही जिंकलो तर घोडेबाजार जिंकला असा तर्क देतात असे म्हणत आम्ही घोडेबाजार केला नाही. पण, महाविकास आघाडीचे पैसे संपले काय, असा उलट प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी अमोल मिटकरी यांना केला. 

पाटील यांच्या या तिरकस प्रश्नाला उत्तर देताना मिटकरी यांनी आमच्याकडे दोन नंबरचा पैसा नाही असे म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी त्यावर व्वा...व्वा...मिटकरी लैच बोलायला लागले. लोकांना माहीत आहे असल्याचे पाटील यांनी म्हटले. 

भाजपचे एक-एक ऑफिस कोट्यवधीचे असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. गुप्त मतदान पैशांनी विकत घेता येता हे भाजपने दाखवून दिले असल्याची लोकांमध्ये चर्चा असल्याचे मिटकरी यांनी म्हटले. घोडेबाजाराच्या आरोपावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली होती. 

पाहा व्हिडिओ: 'हे जिंकले तर यांचं तत्वज्ञान, आम्ही जिंकलो तर घोडेबाजार'

विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.  भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची मते मिळाली असल्याचे समोर आले आहे. अकोल्यातही भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला. 

>> विधान परिषदेचा निकाल काय

> नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
चंद्रशेखर बावनकुळे (भाजप) : 362
मंगेश देसाई (काँग्रेस) : 186
रविंद्र भोयर : 01
अवैध : 5 

> अकोला वाशिम बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघ
वसंत खंडेलवाल (भाजप) : 443
गोपीकिशन बाजोरिया (शिवसेना) : 334
अवैध मते : 31 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांनी नाशिकची चक्रं फिरवली, ठाकरे गटात मोठे फेरबदल; सुधाकर बडगुजरांची उपनेतेपदी निवड, डी. जी. सूर्यवंशींकडे जिल्ह्याचा कारभार
संजय राऊतांनी नाशिकची चक्रं फिरवली, ठाकरे गटात मोठे फेरबदल; सुधाकर बडगुजरांची उपनेतेपदी निवड, डी. जी. सूर्यवंशींकडे जिल्ह्याचा कारभार
CM devendra Fadnavis In Kolhapur : सीएम देवेंद्र फडणवीसांसमोर आंदोलनचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कोल्हापुरात सकाळपासून धरपकड
सीएम देवेंद्र फडणवीसांसमोर आंदोलनचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कोल्हापुरात सकाळपासून धरपकड
Ranya Rao Arrest : थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण...
लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar News | अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कारभार आता अजित पवारांकडे, दादांकडे 3 खात्यांचा भारDatta Gade News | आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेषातील फोटो समोर,पोलीस असल्याचं सांगून करायचा फसवणूकABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 06 March 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha at 7.30AM 06 March 2025 माझं गाव, माझा जिल्हा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांनी नाशिकची चक्रं फिरवली, ठाकरे गटात मोठे फेरबदल; सुधाकर बडगुजरांची उपनेतेपदी निवड, डी. जी. सूर्यवंशींकडे जिल्ह्याचा कारभार
संजय राऊतांनी नाशिकची चक्रं फिरवली, ठाकरे गटात मोठे फेरबदल; सुधाकर बडगुजरांची उपनेतेपदी निवड, डी. जी. सूर्यवंशींकडे जिल्ह्याचा कारभार
CM devendra Fadnavis In Kolhapur : सीएम देवेंद्र फडणवीसांसमोर आंदोलनचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कोल्हापुरात सकाळपासून धरपकड
सीएम देवेंद्र फडणवीसांसमोर आंदोलनचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कोल्हापुरात सकाळपासून धरपकड
Ranya Rao Arrest : थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
थेट पोलिस महासंचालकाची लेक दुबईतून आणलेल्या 15 किलोच्या सोन्याच्या तस्करीत विमानतळावर सापडली; म्हणाले, 'माझ्या करिअरला आजवर डाग लागलेला नाही, पण...'
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण...
लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयेच मिळणार, 2100 रुपयांसाठीचं वेटिंग वाढलं, कारण...
Santosh Deshmukh Case: आकाची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील, एसआयटीने वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा काढला
आकाची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील, एसआयटीने वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टीचा कच्चाचिठ्ठा काढला
Bird Flu : धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग, धोका वाढल्याने एक किलोमीटरच्या कक्षेतील कोंबड्या संपवणार
धाराशिवमध्ये कावळ्यापाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूचा संसर्ग, धोका वाढल्याने एक किलोमीटरच्या कक्षेतील कोंबड्या संपवणार
Virat Kohli : कोपिष्ट जमदग्नी असलेला विराट कोहली अचानक शांत झाला, स्ट्रॅटेजीत आमुलाग्र बदल; पाकिस्तान, ऑस्ट्रेलियानंतर आता न्यूझीलंडला दणका बसणार
विराट कोहलीनं रणनीती बदलली, विरोधी संघांची झोप उडाली, पाकिस्तान ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडला दणका बसणार
Maharashtra Live Updates:  धनंजय मुंडे यांच्याकडील खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे राहणार
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पाचवा दिवस तर राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर
Embed widget