एक्स्प्लोर

Maharashtra Politics: वंचित आणि ठाकरे गटाच्या युतीनं कुणाला फायदा? प्रकाश आंबेडकरांची मुंबईत किती ताकद

Maharashtra Politics: राज्यात आता पुन्हा एकदा शिव शक्ती आणि भीम शक्तीचा प्रयोग केला जाणार आहे आणि याची वाच्यता सुरवातीला प्रकाश आंबेडकर आणि आता उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Vanchit Thackeray alliance update: गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम यांनी युती केली आणि त्यांना यश देखील मिळाले. मात्र पुढे ही युती काही टिकली नाही, आता पुन्हा एकदा वंचित आणि ठाकरे गटाची युती होण्याचे संकेत मिळत आहे.  प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे.  दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये गुप्त बैठका होत असल्याची देखील माहिती आहे. त्यामुळं राज्यात भीम शक्ती आणि शिव शक्तीचा प्रयोग होणार असल्याचं मानलं जात आहे. 
 
सर्व जाती धर्माची मुठ बांधत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली., पुढे औरंगाबादमध्ये जय मिम आणि जय भीमचा नारा देत वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM मध्ये युती झाली, आणि याचे परिणाम संपूर्ण महराष्ट्राने पाहिले. राज्यात कधीकाळी साधा एक नगरसेवक नसलेल्या MIM पक्षाचा जलील यांच्या रूपाने राज्यात पहिला खासदार निवडून आला, मात्र ही युती फारकाळ टिकली नाही, पण आता पुन्हा एकदा शिव शक्ती आणि भीम शक्तीचा प्रयोग केला जाणार आहे आणि याची वाच्यता सुरवातीला प्रकाश आंबेडकर आणि आता उद्धव ठाकरेंनी केली आहे.

वंचितमुळं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीला सात ठिकाणी फटका बसला. इम्तियाज जलील यांच्या रूपाने वंचितचा एक उमेदवार लोकसभेतही गेला. 10-12 मतदारसंघात 15 व्या फेरीपर्यंत वंचितचे उमेदवार आघाडीवर होते. मात्र 2019 महाराष्ट्र विधानसभेत वंचित बहुजन आघाडीने 236  जागा एकट्या लढवल्या. त्यापैकी एकाही जागेवर विजय मिळाला नाही.  तरीही वंचितला 25 लाख 18 हजार 748 मतं पडली. एकूण मतदानाच्या 4.57% टक्के वंचितला मिळाली. तर उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आल्यावर याचा फायदा लोकसभेच्या 38 मतदारसंघात होईल असे शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

गत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीची निर्मिती झालेली नव्हती, प्रकाश आंबेडकरांच्या भारीपने महानगरपालिका निवडणूक लढवली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी लढवलेल्या जागांची काय परिस्थिती होती तेही पाहूयात.

वंचित बहुजन आघाडीची मुंबईत किती ताकद...

विधानसभा 2019 च्या निवडणुकीची टक्केवारी

कुलाबा मतदारसंघ
भाजपा- 83.85%
काँग्रेस 38.66%
वंचित 2.82%

मुंबादेवी विधानसभा
काँग्रेस 54.87%
शिवसेना 32.85
एम आय एम 5.93%
वंचित 1.18%

वरळी विधानसभा
शिवसेना 69.14% 
राष्ट्रवादी 16.91% 
वंचित 5.9%

सायन कोळीवाडा विधानसभा
भाजप 42.24%
काँग्रेस 31.49%
वंचित 8.9%
मनसे 10.54%

वांद्रे पश्चिम विधानसभा

भाजप 57.11%
काँग्रेस 36.88% 
वंचित 2.53%

वांद्रे पूर्व विधानसभा
काँग्रेस 30.28% 
शिवसेना 25.71%
वंचित 2.3% मनसे 8.44%

कलिना विधानसभा
शिवसेना 36.53% 
काँग्रेस 32.37% 
मनसे 18. 89% 
वंचित 2.51%

चेंबूर विधानसभा 
शिवसेना 40.15 टक्के 
काँग्रेस 25.2% 
वंचित 17.47% 
मनसे 10.86%

मानखुर्द विधानसभा
समाजवादी 48.18% 
शिवसेना 30.32% 
वंचित 7.3 टक्के

घाटकोपर पुर्व विधानसभा 
भाजप 57.7% 
मनसे 15.59% 
काँग्रेस 12.44% 
वंचित ८.२७ टक्के

चांदिवली  विधानसभा
शिवसेना 43.74% 
काँग्रेस 43.53% 
वंचित 4.52% 
मनसे 3.62%

विलेपार्ले विधानसभा 
भाजप 61.3% 
काँग्रेस 19.7% 
मनसे 13.22% 
वंचित 2.78%

अंधेरी पूर्व विधानसभा
शिवसेना 42.67%
काँग्रेस 19% 
वंचित 2.93%

वर्सोवा विधानसभा
भाजप 33.98% 
काँग्रेस 29.69% 
मनसे 4.17% 
वंचित 2.13%

गोरेगाव विधानसभा
भाजप 53.34% 
काँग्रेस 21.23% 
मनसे 17.52% 
वंचित 3.52%

चारकोप विधानसभा
भाजप 71.1% 
काँग्रेस 22.64% 
वंचित 1.66%

कांदिवली पूर्व विधानसभा
भाजप 63.22% 
काँग्रेस 24.35% 
मनसे 7.52% 
वंचित 1.87%

दिंडोशी विधानसभा
शिवसेना 52.61% 
राष्ट्रवादी 24.13% 
मनसे 16.55% 
वंचित 2.13%

जोगेश्वरी पूर्व
शिवसेना 60.86% 
काँग्रेस 21.39% 
वंचित 3.41%

भांडुप पश्चिम विधानसभा
शिवसेना 45.70% 
मनसे 26.86% 
काँग्रेस 19.29% 
वंचित 4.71%

विक्रोळी विधानसभा 
शिवसेना 49.8% 
राष्ट्रवादी 27.32% 
मनसे 12.54% 
वंचित ७.१५ टक्के

मुलुंड विधानसभा 
भाजप 56.46% 
मनसे 19.35% 
काँग्रेस 15.44% 
वंचित 3.8%

वंचित-MIM युतीच्या यशानंतर हा प्रयोग केला जात आहे, याची सुरवात मुंबई महानगरपालिकेपासून केली जाणार आहे, मात्र यात कितपत यश मिळणार याचा अंदाज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतला जाईल, त्यानंतरचा महाराष्टात ही युती करायची का याचा विचार उद्धव ठाकरे करतील, विशेष म्हणजे पूर्वी देखील बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिव शक्ती-भीम शक्तीचा प्रयोग केला होता, आता उद्धव ठाकरे यांनी देखील हाच मार्ग धरला असून, ही युती होणार का आणि त्याला किती यश मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
Embed widget