(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona Update : राज्यात रविवारी 255 कोरोना रूग्णांची नोंद, एका बाधिताचा मृत्यू
Maharashtra Corona Update : आज महाराष्ट्रात 255 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 175 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,31,467 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
Maharashtra Corona Update : शनिवारच्या तुलनेत रविवारी राज्यातील कोरोना (Coronvirus) रूग्णांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे. आज महाराष्ट्रात 255 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 175 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत 77,31,467 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.10 टक्के एवढे झाले आहे.
एका रूग्णाचा मृत्यू
आज राज्यात एका करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के एवढा असून राज्यात सध्या 1518 सक्रिय रूग्ण आहेत. यातील सर्वात जास्त सक्रीय रूग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत सध्या 885 सक्रीय रूग्ण आहेत.
राज्यात काल 248 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. त्यामध्ये आज थोडीशी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज सात रूग्णांची वाढ झालीय.
देशातील रूग्णसंख्येत घट
दरम्यान, देशातील कोरोना रूग्णांमध्ये किंचिंत घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 487 नवे कोरोनाबाधित आढळले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर शनिवारी दिवसभरात 2 हजार 878 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 17 हजार 692 वर पोहोचला आहे. सध्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.74 टक्के झाले आहेत. त्या शनिवारी 2 हजार 858 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5 लाख 24 हजार 214 इतकी झाली आहे.
देशात सध्या लसीकरण मोहिमेवर जास्त भर देण्यात येत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 4 लाख 5 हजार 156 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
Akshay Kumar : अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; कान्स चित्रपट महोत्सवात दिसणार नाही खिलाडी कुमार