मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलोख उतरणीला लागला आहे. राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज राज्यात 1094 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले तर 1747 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. 


राज्यातील मृत्यूदर 1.82%


 राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.08 एवढे झाले आहे. राज्यात आज पाच कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत 79,52,049 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 7043 सक्रिय रुग्ण आहेत. 


मुंबईत बुधवारी 635 रुग्णांनी कोरोनावर मात


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,25,109 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98.1 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,714 झाली आहे. सध्या मुंबईत 2,218 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 316 रुग्णांमध्ये 299 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 2249 दिवसांवर गेला आहे.