बीड : तब्बल  दोन महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात  सोमवारी एकाचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, ही बाब जिल्हावासीयांसाठी मोठी दिलासादायक मानली जात आहे. 17 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या जिल्ह्यात 68 रुग्ण सक्रिय आहे. 


बीडमध्ये सोमवारी  कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. 248 नमुन्यांमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून मागच्या दोन महिन्यानंतर आज पहिल्यांदा जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.29 टक्के आहे.


बीड जिल्ह्यात आतापर्यंत 11,66,918 जणांनी कोरोनाची तपासणी केली आहे.  तर 1,08,338 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1,05,400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  तर 2870 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा डेथ रेट 2.64 टक्के आहे.  रविवारी (20 फेब्रुवारी) बीड जिल्ह्यात 85 रुग्ण आढळले. त्यापैकी 34 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहे. 


रविवारी राज्यात एक हजार 437 नवे रुग्ण


रविवारी राज्यात एक हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली आहे. कारण मुंबई, पुणे जिल्हा, पुणे मनपा आणि अहमदनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात तीन आकडी रुग्णसंख्या नाही. तीन जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तर 20 पेक्षा जास्त जिल्ह्यात फक्त एकेरी रुग्णवाढ आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्सने याबाबतचे संकेतही दिले आहेत.  सहा रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी राज्यात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दैनंदिन कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोना मृत्यूच्या संख्येतही घट दिसत आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्के आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Maharashtra Corona Update : तिसरी लाट ओसरली, रविवारी राज्यात एक हजार 437 कोरोना रुग्णांची नोंद, सहा मृत्यू



Latur : पहिली ते चौथीच्या शाळा सुरू, तब्बल 2 वर्षांनंतर वाजली शाळेची घंटा


Rajesh Tope : महाराष्ट्रात निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं विधान! म्हणाले, मार्चमध्ये...