Sugar Rate News : महाराष्ट्रात यावर्षी ऊस लागवड (Maharashtra Sugarcane News) क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्यात दहा टक्के इथेनॉलचे उत्पादन करुनही साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे यावर्षी साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.
गतवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस काळ झाल्याने उसाची लागवड क्षेत्र वाढले आहे त्यामुळे कारखान्यांचा गाळप हंगाम सुद्धा लांबणीवर पडणार असल्याची माहिती आहे कारण सर्व उसाचे कमी कालावधीत गाळप करणे प्रत्येक कारखान्यांना शक्य नाही . त्यामुळे प्रत्येक कारखान्याचा गाळप हंगाम हा 160 दिवसापर्यंत असावा अशी माहिती जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे.
यावर्षी साखरेच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे देशाला दरवर्षी 265 लाख टन इतक्या साखरेची आवश्यकता असते परंतु या वर्षी या पेक्षाही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे आणि गाळप हंगाम सुरू असल्याने हे उत्पादन अजूनही वाढणार आहे त्यामुळे साखरेचे भाव कमी होण्याची शक्यता आहे मधल्या काळात हीच साखर 3300 रुपये प्रति क्विंटल होती. आता ते भाव कमी होऊन तीन हजार 100 रुपये प्रति क्विंटल असे झाले आहेत. तर पुढील काळात हे भाव तीन हजाराच्या जवळपास असण्याची शक्यता जयप्रकाश दांडेगावकर यांनी वर्तवली आहे.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात होत असते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही या साखरेची किंमत घसरण्याची शक्यता सुद्धा नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा मोठ्या प्रमाणात भाव घसरण्याची शक्यता आहे, असं दांडेगावकर यांनी म्हटलं आहे.
मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील ऊस शिल्लक
महाराष्ट्रात शिल्लक उसाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे प्रदीर्घ कालावधी होऊनही ऊसतोड होत नसल्याने उसाला तुरे फुटतात आहेत परिणामी उसाच्या वजनात घट होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उसाचा गाळप हंगाम कालावधी वाढवण्यात यावा आणि ऊस बियाणांमध्ये बदल करणे गरजेचे असल्याचे दांडेगावकर यांनी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळले जाऊ शकते, असं त्यांनी म्हटलं आहे.