एक्स्प्लोर

सरकारनं लोकशाही बंद केली, फक्त 'रोकशाही' आणि 'रोखशाही' सुरु : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Press Conferance : सरकारनं लोकशाही बंद केली, फक्त 'रोकशाही' आणि 'रोखशाही' सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Devendra Fadnavis Press Conferance : राज्याचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. राज्यात बरेच मुद्दे सध्या तापलेले आहेत. त्यामुळे या अधिवेशनात अनेक मुद्दे विरोधकांच्या भात्यात असणार आहेत. अधिवेशनापूर्वी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं झाली. अशातच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "उद्यापासून विधानमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या सरकारच्या परंपरेप्रमाणे जितकी लहानात लहान अधिवेशनं घेता येतील, जेवढ्या जास्तीत जास्त चर्चा टाळता येतील आणि जेवढी लोकशाही कुलुपबंद करता येईल, तेवढी करण्याचा प्रयत्न या छोट्याशा अधिवेशनातून केला जात आहे." 

देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले की, "12 आमदार बाहेर ठेवून अध्यक्ष पदाची निवडणुक घ्यायची? याचा अर्थ हे सरकार किती असुरक्षित आहे हे दिसते. गुप्त मतदानाने निवडणूक घेण्याची पद्धत असताना हे नियमबाह्य मतदान करण्याची तयारी करत आहे. नियम समितीचे नियम डावलून प्रस्ताव सादर करणार आहेत. लोकशाही कुलूप बंद करता येईल असं छोटे अधिवेशन सत्ताधारी घेत आहेत. राज्यात अधिवेशन घ्यायची मानसिकता नाही. या सरकारने लोकशाही बंद केली आहे. फक्त 'रोकशाही' आणि 'रोखशाही'  सुरु आहे."

भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार : देवेंद्र फडणवीस 

"भ्रष्टाचारानं बरबटलेलं सरकार आहे. विरोधकांनी बोलू नये म्हणून एक-एक वर्षासाठी आमदारांना निलंबित करण्याचं काम या सरकारच्या दबावाखाली होत आहे. आपल्या आमदारांवर यांचा विश्वास नाही, म्हणून यांनी आमचे आमदार निलंबित केले आहेत.", असं म्हणत गेल्या अधिवेशनातील भाजप आमदारांच्या निलंबनावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

सरकारच्या नाकर्तेपणा ओबीसी आरक्षण गेलं : देवेंद्र फडणवीस 

ओबीसीबाबत हे सरकार उघडं पडलं. दोन वर्षं झाली तरी हे डेटा गोळा करू शकले नाही. दोन वर्ष या सरकारनं घालवली. या सरकारच्या नाकर्तेपणा ओबीसी आरक्षण गेले आहे, असा घणाघात ओबीसी आरक्षणावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. तसेच "विजेचे कनेक्शन कापण्याचे काम या राज्यात सुरु आहे. सुलतानी पद्धतीने वीज कनेक्शन कापण्याचं काम हे सरकार करत आहे. केंद्र सरकारने दिलेली मदत देखील हे सरकार पोहोचवू शकलेलं नाही. आमच्या काळात हजारो कोटींचा विमा मिळत होता तरी हे मोर्चे काढत होते. मात्र याच्या काळात सहा हजार कोटी विमा कंपन्यांच्या घशात घातलेत", असा आरोप फडणवीसांनी केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil Letter To Devendra Fadnavis On Student Protest: NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; बिहार आणि आसामसारखे परिपत्रक काढण्याची मागणी
NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या; जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; बिहार आणि आसामसारखे परिपत्रक काढण्याची मागणी
MPSC FDA Paper Leak: तीन महिन्यांपूर्वीं परीक्षेत 21, 222 वा नंबर अन् FDA च्या परीक्षेत थेट पहिल्या शंभरात स्थान, 'त्या' तीन विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये चक्रावणारा बदल, मेहबुब शेख यांचा गंभीर आरोप
तीन महिन्यांपूर्वीं परीक्षेत 21, 222 वा नंबर अन् FDA च्या परीक्षेत थेट पहिल्या शंभरात स्थान, 'त्या' तीन विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये चक्रावणारा बदल, मेहबुब शेख यांचा गंभीर आरोप
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Parbhani Crime News: 'व्यवहार विसरून जा, परत फोन केला तर...'; आमदाराच्या जावयासह महादेव जानकरांची तब्बल 14 कोटींची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?
'व्यवहार विसरून जा, परत फोन केला तर...'; आमदाराच्या जावयासह महादेव जानकरांची तब्बल 14 कोटींची फसवणूक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
Embed widget