जरांगेंचं उपोषण खुर्चीसाठी, उपोषण करायला बारामतीहून सांगितलं होतं का? अजय बारस्करांचा सवाल
मनोज जरांगे स्वतः फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत अशी टीका अजय बारस्करांनी केली आहे.
मुंबई : मनोज जरांगेंचं (Manoj Jarange) उपोषण राजकारणाने प्रेरित होतं, खुर्चीसाठी सुरू होतं. उपोषण करायला बारामतीहून सांगितलं होतं का?,असा आरोप अजय बारस्करांनी (Ajay Maharaj Baraskar) केला आहे. 7 उपमुख्यमंत्री करणार असं जरांगे म्हणाले, पण मुख्यमंत्री कोणाला करणार हे जरांगेंनी सांगितलं नाही असं ते म्हणाले. जरांगे स्वतः फसवणूक प्रकरणात आरोपी आहेत अशी टीका त्यांनी केली आहे .
बारस्कर म्हणले, आज मनोज जरांगे यांच्या तोंडातून सगळं बाहेर आलं. खरच मराठ्यांसाठी सुरु होतं की, राजकीय होतं हे आज त्यांनी उलगडलं आहे. त्यांच्या उपोषणातील एक वाक्य आहे की हे उपोषण बेगडी आहे. मराठे भोळेपणाने प्रेम करतात. तुम्हाला कोणी उपोषण करायला सांगितलं होतं. बारामतीकडचे तुम्हाला सांगितलं होतं का? हा माणूस लबाड आहे यांनी गुप्ता बैठका घेतल्या. अशोक चव्हाण यांच्याबरोबर ही बैठका घेतल्या. मराठ्यांनो खुर्ची हिसकायाला तयार राहा आज पाटील म्हणाले. या वाक्यातून ओळखा खुर्चीसाठी आणि राजकारणासाठी सुरु होतं.
पाटीलला कायद्याची काडीची अक्कल नाही : बारस्कर
मनोज जरांगे म्हणत होता की सात उपमुख्यमंत्री करणार पण मुख्यमंत्री कोण होणार हे सांगितलं नाही. सगेसोयेरे ऐकून ऐकून लोकं पागल झालेत. समोर येऊन चर्चा करा असं म्हणतोय . पाटीलला कायद्याची काडीची अक्कल नाही . सगेसोयरे यांच्यामुळे किती लोकांचा फायदा होणार आहे? पाटीलचा शेवट सुरु झाला आहे. तुझी बुद्धिमत्ता काय आहे मला माहिती आहे. काही मागण्या करत बसतो. हैद्राबाद गॅझेट लागू करा म्हणजे काय?, असे बारस्कर म्हणाले.
किती लोकांना या आरक्षणाचा फायदा झाला? बारस्करांचा सवाल
हा तर 420 चा गुन्हेगार आहे. तो कपाळावरही आहे. याच्यावर कोर्टाने ताशेरे ओढलेत. स्वतःवरच्या केसेस मिटवा नंतर समाजात जा.
हा कोर्टात उपस्थित राहत नाही त्यामुळे कोर्ट म्हणाले हा न्याय व्यवस्थेपेक्षा मोठा आहे का? किती लोकांना या आरक्षणाचा फायदा झाला सांगा? यांच्या सभाचे ऑडिट झाले पाहिजे. ज्या गावात आत्महत्या झाल्या तिथे हा हारतुरे घेतोच कसा? असा सवाल बारस्कर यांनी केली.
जरांगे पाटील यांच्यासाठी वेगळी न्याय व्यवस्था करा :बारस्कर
जरांगे पाटील यांच्यासाठी वेगळी न्याय व्यवस्था करा. त्यांच्यावर कोर्टाने दखल घेऊन गुन्हा दाखल करा, याचा कोणावर विश्वास नाही.
भाजपची काही धोरणे चुकली आहेत पण मला जेलमध्ये टाकलं तर असं होईल तसं होईल म्हणणं चुकीचं आहे . तो घाबरट आहे, झुंडशाही विरोधात अनेक लोकं पुढे येतील. राजकीय लोकं बोलत नाही याविरोधात तर सामाजिक भान असणाऱ्या लोकांनी या विरोधात बोलावं, असेही बारस्कर म्हणाले.