News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मराठवाड्यात दोन वर्षात 2 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

FOLLOW US: 
Share:
औरंगाबाद : मराठवाड्यात सलग दुसऱ्या वर्षीही शेतकरी आत्महत्यांनी एक हजारचा आकडा पार केला आहे. आत्महत्यांचं सत्र या वर्षातही सुरु असून 1 जानेवारी ते 12 डिसेंबर 2016 या काळात तब्बल 1003 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती औरंगाबाद विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे. दुष्काळामुळे गेल्यावर्षी म्हणजे 2015 मध्ये 1 हजार 130 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. तर यावर्षी देखील हा आकडा एक हजारच्या पुढे गेला आहे. बीडमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत 214 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा आकडा वाढला नसला तरी देखील ही अत्यंत चिंतेची बाब मानली जात आहे. गेल्या वर्षी एकूण 300 शेतकरी दुष्काळाचे बळी ठरले होते. बीडनंतर नांदेडमध्ये यावर्षी सर्वाधिक 170 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. तर उस्मानाबाद 153, औरंगाबाद 145 आणि लातूरमध्ये 108 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये 100 पेक्षा कमी शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. आत्महत्या केलेल्या एक हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबांपैकी 661 कुटुंबांना शासकीय मदत देण्यात आली आहे. सतत चार वर्षे पावसाने ओढ दिल्याने कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. या वर्षात देखील शेतकरी आत्महत्यांचं सत्र मागच्या वर्षीप्रमाणेच कायम राहिल्याचं चित्र आहे.
Published at : 14 Dec 2016 06:07 PM (IST) Tags: Farmer Suicide शेतकरी आत्महत्या

आणखी महत्वाच्या बातम्या

Bhandara Crime: संपत्ती मिळावी म्हणून एकुलत्या एक जावयानं घात केला; मित्राच्या मदतीने सासऱ्याला रस्त्यात गाठून संपवलं, मृतदेह पुलाखाली लपवला अन्...

Bhandara Crime: संपत्ती मिळावी म्हणून एकुलत्या एक जावयानं घात केला; मित्राच्या मदतीने सासऱ्याला रस्त्यात गाठून संपवलं, मृतदेह पुलाखाली लपवला अन्...

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स, एका क्लिकवर

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स, एका क्लिकवर

Devendra Fadnavis on Vadapav: देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला

Devendra Fadnavis on Vadapav: देवेंद्र फडणवीसांच्या सभेतील 'त्या' एका वाक्यावरुन 'सामना'तून रान उठवलं, थेट महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या मुद्द्यालाच हात घातला

Ajit Pawar On Sinchan Scam: युती सरकारने पार्टी फंडसाठी प्रकल्पाच्या किंमतीत 100 कोटी मागितले; सिंचन घोटाळ्यावरुन अजितदादांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar On Sinchan Scam: युती सरकारने पार्टी फंडसाठी प्रकल्पाच्या किंमतीत 100 कोटी मागितले; सिंचन घोटाळ्यावरुन अजितदादांचा गौप्यस्फोट

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...

Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...

टॉप न्यूज़

Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या

संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग

संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता

मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता