एक्स्प्लोर

नरेंद्र मोदींपासून सत्य का लपून ठेवले? अमित शाहांना संजय राऊतांचा सवाल

विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव जाहीर केले त्यावेळी सेनेने आक्षेप का घेतला नाही? असा सवाल शाह यांनी केला. त्याला संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे.

मुंबई : भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी नरेंद्र मोदींपासून सत्य लपून का ठेवले? असा सवाल करत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शाहांना प्रत्त्युत्तर दिले आहे. कुणीतरी पंतप्रधान मोदी आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण करत असल्याचा आरोप देखील यावेळी राऊत यांनी केला. अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पहिल्यांदाच राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा पंतप्रधान मोदी व मी जाहीर भाषणातून केली. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असे वक्तव्य अमित शाहा यांनी केले आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले. पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नव्हती. त्यामुळं देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असता. आम्हाला मोदी आदरणीय आहे आणि नेहमी राहतील. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. मात्र, आम्हीही शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा वारंवार उल्लेख केला. त्यावेळी भाजपने का आक्षेप घेतला नाही. काय म्हणाले संजय राऊत? बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाली. हे मोदींपर्यंत पोहचवले गेले नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला. बंद दाराआड झालेली चर्चा काय होती हे अमित शाह यांनी उघड करावे. कारण ही चर्चा ज्या ठिकाणी झाली ती जागा साधीसुधी नाही. मातोश्रीवरील ज्या खोलीमध्ये शाह आणि उद्धव यांच्यामध्ये चर्चा झाली बाळासाहेबांची खोली होती. याच खोलीमध्ये बसून बाळासाहेबांनी अटलजी, आडवाणींपासून मोदींपर्यंत अनेकांना आशीर्वाद दिले आहेत. ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे. येथे झालेली चर्चा कोणी नाकारत असेल तर तो बाळासाहेबांचा आणि महाराष्ट्राचा आहे. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, असे संजय राऊत म्हणाले. पुढे ते म्हणाले, आम्ही व्यापारी नाही, राजकारण हा आमचा धंदा नाही. भीती आणि धमक्यांना आम्ही भीत नाही, जे आम्हाला भिती दाखवतील त्यांना आम्ही धडा शिकवू. संबंधित बातम्या - शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचंच डोकं फुटेल : दिलीप लांडे

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Sunetra Pawar Beed : रात्री अकरापर्यंत बैठका..., सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
रात्री अकरापर्यंत बैठका..., सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
Uddhav Thackeray Call Abhijeet Dipke : दोन्ही शिवसेना अभिजीत दीपके यांच्या प्रेमात! शिरसाट, बच्चू कडूंपाठोपाठ खैरे भेटीला; ठाकरेंचं दिपके परिवाला 'मातोश्री'वर येण्याचं आमंत्रण, लग्नाबाबतही केली चौकशी
दोन्ही शिवसेना अभिजीत दीपके यांच्या प्रेमात! शिरसाट, बच्चू कडूंपाठोपाठ खैरे भेटीला; ठाकरेंचं दिपके परिवाला 'मातोश्री'वर येण्याचं आमंत्रण, लग्नाबाबतही केली चौकशी
Mumbai Crime News: पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ
पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् संतापाच्या भरात पोटच्या गोळ्याचा काढला काटा, समुद्रात नेलं अन्...; घटनेनं मुंबईत खळबळ

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget